Honey Singh :"माझ्या मेंदुत काहीतरी प्रॉब्लेम आहे" ! हनी सिंह असं का म्हणाला?

बॉलिवूडचा रॅपर हनी सिंहने एक काळ गाजवला होता पण आता मात्र तो बायपोलर डिसऑर्डर आजाराने त्रस्त आहे.
Honey Singh
Honey SinghDainik Gomantak
Published on
Updated on

एक काळ होता जेव्हा रॅपर हनी सिंहचं म्युझिक लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. 'ब्राउन रंग', 'देसी कलाकार' आणि 'ब्लू आईज सारखी हिट देउन हनी सिंहने आपला दबदबा निर्माण केला होता. या काळात त्याला इंडस्ट्रीत पर्याय नव्हता. पण त्याच्या या स्टारडमला दृष्ट लागली असं म्हणावं लागेल कारण आता हनी सिंहचं ते स्टारडम तर गेलंच पण त्याला एका विचित्र आजाराने घेरलंयय.

सध्या हनी सिंह बायपोलर डिसऑर्डर या आजाराने त्रस्त होता. आणि याच कारणामुळे तो गेले कित्येक काळ नैराश्यात होता. याच कारणामुळे हनी सिंह सध्या म्युझिकपासुन लांब तर होताच पण औषधांमुळे त्याचं वजन कमालीचं वाढलं आहे.

पण तरीही हनी सिंहने जिद्द सोडली नाही, आजही तो नवी सुरूवात करायला तयार आहे. हनी सिंह आता पुन्हा त्याच जोशात यायला तयार झाला आहे. तो आता आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहे.अलिकडेच हनी सिंहने एका मुलाखतीत आपल्या आजाराबद्दल आणि आगामी प्रोजेक्टबद्दला माहिती दिली. हनी सिंहने त्याला झालेल्या बायपोलर डिसऑर्डर या आजाराबद्दल माहिती देताना सांगितले कि या आजारानंतर कसं लोकांचं त्याच्याशी वागणं बदललं.

2014 सालीच आपल्याला हा आजार झाल्याचं कळलं होतं. त्यानंतर हनी सिंहची गाणी येणं पुर्णत: थांबली. त्यानंतर हनी सिंह लोकांना दिसेनासा झाला होता. याच काळात हनी सिंहचं दारु पिण्याचं प्रमाण खुप वाढलं होतं.

या मुलाखतीत हनी सिंहने सांगितलं "मी आजारी पडलो तेव्हा खुप गोष्टी सुरू होत्या. शाहरुखसोबत माझी एक प्रोजेक्ट टूर होती. मी स्टार प्लससोबतसुद्धा एका प्रोजेक्टवर काम करत होतो. या प्रोजेक्टसाठी मी एक वर्ष काम करत होतो. जेव्हा शो सुरू झाला तेव्हा खुप सारं काम होतं. मी एक पंजाबी चित्रपटसुद्धा करत होतो. आणि अचानक गोष्टी बदलल्या. मी जेव्हा 'रॉ स्टार'च्या सेटवर बेशुद्ध झालो तेव्हाच मला आजाराबद्दल माहिती मिळाली. तेव्हाच मी सांगितलं होतं की माझ्या डोक्यात काही प्रॉब्लेम आहे मला याला ठीक करु द्या".

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com