Rishi Singh Indian Idol 13 Dainik Gomantak
मनोरंजन

Indian Idol 13 : देशाला मिळाला 13 वा उत्कृष्ट गायक...ऋषी सिंगने जिंकली इंडियन आयडलची ट्रॉफी...

इंडियन आयडल चा 13 वा सिजन संपला असुन ऋषी सिंगने हा सिजनमध्ये बाजी मारली आहे.

Rahul sadolikar

प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'ने देशाला आतापर्यंत 12 सर्वोत्कृष्ट गायक दिले आहेत आणि आता 13वा विजेता देखील प्रेक्षकांसमोर आहे. अनेक महिने आपल्या मधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या स्पर्धकांमध्ये माने-मानेची लढत फिनालेमध्ये पाहायला मिळाली. 

दरम्यान, हा शो अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. पण चढ-उतारांच्या दरम्यान हा शो अखेर ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचला आणि सीझन 13 चा विजेता ठरला. इंडियन आयडॉल 13 च्या विजेत्याची ट्रॉफी अयोध्येतील रहिवासी ऋषी सिंगने जिंकली आहे.

ऋषी सिंग सुरुवातीपासूनच आपल्या सुरेल आवाजाने लोकांची मने जिंकत आहेत. सुरुवातीपासूनच त्याने आपल्या गाण्यांनी प्रेक्षक आणि जज दोघांचीही मने जिंकली आहेत. एवढेच नाही तर सर्व पाहुण्यांनीही त्याच्या आवाजाचे कौतुक केले आहे. 

अलीकडेच इंडियन आयडॉलच्या मंचावर अब्बास मस्तान पाहुणे म्हणून आले होते. यादरम्यान ऋषी सिंह यांचा आवाज ऐकून ते स्वत:ला त्यांची स्तुती करण्यापासून रोखू शकले नाहीत.

इंडियन आयडॉल 13 च्या अंतिम फेरीत सहा स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत झाली. सोनाक्षी कार, शिवम सिंग, ऋषी सिंग, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती आणि देवोस्मिता राय यांच्यात ही स्पर्धा होती. 

शेवटच्या वेळी ग्रँड फिनालेमध्ये सर्व स्पर्धकांनी त्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. ऋषी सिंगने 13व्या हंगामात ट्रॉफी जिंकली, तर देबोस्मिता राय प्रथम उपविजेते आणि चिराग कोतवाल द्वितीय उपविजेते ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT