<div class="paragraphs"><p>Birthday</p></div>

Birthday

 

Dainik Gomantak

मनोरंजन

लव्ह स्टोरी सक्सेसफुल! पण रिचा आणि अलीचे लग्न लांबणीवर

दैनिक गोमन्तक

रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) हे तरुणाईमधील सर्वात लोकप्रिय जोडपे आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असून आता ते लग्न करणार आहेत. मात्र काही काळापासून कोविडमुळे दोघांचे लग्न पुन्हा पुन्हा पुढे ढकलले जात आहे. दोघांनीही लवकरात लवकर लग्न करावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. आज रिचाच्या वाढदिवसानिमित्त (Birthday) चाहत्यांकडून भरभरुन शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्याच बरोबर चाहत्यांच्या कमेंट्स मधुन लग्नांबद्दलही प्रश्न विचारले जात आहेत.

ऋचा आणि अली पहिल्यांदा 2012 मध्ये फुकरे चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. एकत्र काम करत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. रिचाने सांगितले होते की, एकदा ते दोघेही त्यांच्या घरात चॅप्लिन पाहत होते आणि नंतर त्यांनी अलीला पहिल्यांदा आय लव्ह यू म्हटले होते. त्याचवेळी अलीने रिचाला आय लव्ह यू म्हणायला तीन महिने घेतले होते. दोघांनीही आपापल्या मनातील गोष्टी व्यक्त करत, एकमेकांशी जोडले गेले.

5 वर्षे त्यांनी आपले नाते चाहत्यांसमोर उघड केले नाही, व्हेनिसमध्ये व्हिक्टोरिया आणि अब्दुलच्या वर्ल्ड प्रीमियरच्या वेळी रिचा आणि अलीने सर्वांसमोर त्यांचे प्रेम अधिकृतपणे स्वीकारले. ऋचाने सांगितले होते की मालदीवच्या (Maldives) ट्रिप दरम्यान अलीने बेटावर एक छोटेसे आणि रोमँटिक डिनर सेट केले होते. अलीने शॅम्पेनची बाटली उघडली आणि गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घातली होती.

2020 मध्ये रिचा (Richa Chadha) आणि अलीचे (Ali Fazal) लग्न (Marriage) होणार होते, परंतु कोविडमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. दोघांनाही आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रमैत्रिणींसोबत भव्यदिव्य लग्न करायचे आहे, त्यामुळे दोघांनीही लग्न रद्द करण्याचा विचार केला आहे. दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवत असले तरी हा सोहळा त्यांना सर्वांच्या साक्षीने पार पाडायचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

SCROLL FOR NEXT