Munawwar Rana Passed Away Dainik Gomantak
मनोरंजन

Munawwar Rana: प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

राणा गेल्या अनेक महिन्यांपासून किडनी आणि हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते.

Pramod Yadav

Munawwar Rana Passed Away

"भुला पाना बहुत मुश्किल है सब कुछ याद रहता है; मोहब्बत करने वाला इस लिए बरबाद रहता है!"

असे प्रसिद्ध शेर आणि गझल लिहणारे प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 71 वर्षी लखनौमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राणा गेल्या काही महिन्यांपासून किडनी आणि हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू होते.

मुनव्वर यांची मुलगी सुमैया हिने गुरुवारी एका व्हिडिओच्या माध्यामातून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून तिच्या वडिलांची प्रकृती खालावली असल्याचे सांगितले होते.

डायलिसिस दरम्यान त्यांना पोटात तीव्र वेदना होत होत्या. डॉक्टरांनी सीटी स्कॅन केले आणि त्याच्या पित्ताशयात काही समस्या आढळल्या. त्यानंतर त्याचे ऑपरेशन करण्यात आले, असे सांगितले होते.

मुनव्वर यांना तीनदा हृदयविकाराचा झटका आला, असे मुनव्वर यांची मुलगी फाजिया राणा हिने सांगितले. ऑपरेशननंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे फाजिया म्हटले होते. त्यांनी जेवणही केले. मात्र शनिवारी (दि.14) दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्रकृती खालावली.

रविवारी संध्याकाळी त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि काही वेळातच रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांना तिसरा हृदयविकाराचा झटका आला. तिसऱ्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले, अशी माहिती समोर येत आहे.

मुनव्वर राणा हे भारतातील प्रसिद्ध उर्दू शायर होते. त्यांनी अनेक गझल लिहिल्या आहेत. देशात असहिष्णुतेचा आरोप करत त्यांनी 2014 मध्ये उर्दू साहित्यासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला होता. त्यानंतर त्यांनी कधीही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही अशी शपथ घेतली.

मुनव्वर यांची मुलगी सुमैया समाजवादी पक्षाची सदस्य आहे. राणा हे त्यांच्या राजकीय वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 09 November 2024: नवीन काम हाती घेण्याच्या विचारात असाल तर आजचं भविष्य नक्कीच जाणून घ्या !!

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: नोकऱ्यांचा लिलाव

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT