Satish Kaushik Celebrating Holi dainik gomantak
मनोरंजन

Satish Kaushik Death: प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

सतीश कौशिक हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता, विनोदी कलाकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते.

Pramod Yadav

Satish Kaushik Death: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. त्यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून या दुःखद बातमीची माहिती दिली.

सतीश कौशिक हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता, विनोदी कलाकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1965 रोजी हरियाणामध्ये झाला. बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी त्यांनी थिएटरमध्ये काम केले.

मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे मला माहीत आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिक बद्दल असे कधी लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते.

45 वर्षांच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम मिळाला. सतीश तुझ्याशिवाय आयुष्य अजिबात सारखे नसेल! ओम शांती. असे ट्विट अभिनेते अनुपम खेर यांनी केले आहे.

चित्रपट अभिनेता म्हणून सतीश कौशिक यांना 1987 च्या मिस्टर इंडिया चित्रपटाच्या कॅलेंडरमधून ओळख मिळाली. यानंतर त्यांनी 1997 मध्ये आलेल्या दिवाना मस्तानामध्ये पप्पू पेजरची भूमिका साकारली होती.

सतीश कौशिक यांना 1990 मध्ये राम लखन आणि 1997 मध्ये साजन चले ससुरालसाठी सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

सतीश कौशिक यांचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले. किरोरी माल महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला.

1983 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1985 मध्ये तिने शशी कौशिकसोबत लग्न केले. मात्र लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मुलाचे वयाच्या दुसऱ्या वर्षी निधन झाले.

दिग्दर्शक म्हणून सतीश कौशिक यांनी जहाँ रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते हैं, हमारा दिल आपके पास है, मुझे कुछ कहना है, बधाई हो बढाई, तेरे नाम, क्यूंकी, ढोल, कागज यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

तसेच, अभिनेता म्हणून त्यांनी मिस्टर इंडिया, मोहब्बत, जलवा, राम लखन, जमाई राजा, अंदाज, मिस्टर अँड मिसेस खिलाडी, साजन चले ससुराल, दीवाना मस्ताना, परदेसी बाबू, बडे मियाँ छोटे मियाँ, हसिना मान जायेगा, राजा जी हे चित्रपट केले. "आ अब लौट चलें , हम आपके दिल में रहते हैं , चल मेरे भाई , हद कर दी आपने , दुल्हन हम ले जाएंगे , क्यूंकी में झूठ नहीं बोलता , गॉड तुस्सी ग्रेट हो आणि कागज ",यासारख्या चित्रपटात काम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT