Rekha - Kabir Bedi Viral Photo Dainik Gomantak
मनोरंजन

Rekha - Kabir Bedi Viral Photo : अभिनेत्री रेखाला या अभिनेत्यासोबत पाहुन प्रेक्षकांना आली त्या भयंकर सीनची आठवण.

अभिनेत्री रेखा आणि कबीर बेदी यांचा एकत्र फोटो व्हायरल होत आहे. त्यावरुन प्रेक्षकांना एक जुना भयंकर सीन आठवला आहे.

Rahul sadolikar

अभिनेत्री रेखा तशा सोशल मिडीयावर सतत चर्चेत असतात. नुकतीच सदाबहार अभिनेत्री रेखाने चित्रपट अभिनेता कबीर बेदीसोबत पोझ दिली. दोघांचे फोटो फिल्मफेअर अवॉर्ड नाईटचे आहेत. दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना ‘खून भरी मांग’ चित्रपटाची आठवण झाली. 

विशेष म्हणजे हा त्याच्या काळातील सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटात दोघांची जोडी खूपच छान दिसत होती. दोघांनी एकत्र काम केले आणि प्रेक्षकांना एका वेगळा अनुभव दिला. हा चित्रपट दोघांच्या करिेअरमधला एक महत्त्वाचा चित्रपट समजला जातो.

कबीर बेदी यांनी इंस्टाग्रामवर ६८व्या फिल्मफेअर अवॉर्डचे फोटो शेअर केले आहेत. गुरुवारी रात्री हा अवॉर्ड शो झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले होते. फोटो शेअर करताना कबीर बेदींनी लिहिले, ' सदाबहार अभिनेत्री रेखाला 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये भेटलो . ती मेरी खून भरी मांगची सहकलाकार देखील आहे. तिच्याशी छान गप्पा झाल्या.

रेखा आणि कबीर बेदी यांना पाहून मगरीच्या दृश्याच्या आठवणी प्रेक्षकांमध्ये ताज्या झाल्या आहेत. एकाने लिहिले, 'हे पाहून मला आठवले की तुम्ही मगरीसमोर कसे फेकले होते. बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. 

खून भरी मांग 1988 मध्ये रिलीज झाला होता. हा ऑस्ट्रेलियन चित्रपटाचा रिमेक होता. विशेष म्हणजे या चित्रपटात कबीर बेदीने रेखाला बोटीतून फेकले. यानंतर मगरीने त्यांना चावा घेतला. पण यांनंतरही, ती जगते आणि कॉस्मेटिक सर्जरीद्वारे चेहरा बदलते आणि नंतर कबीर बेदीचा बदला घेते.

रेखा एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आहेत पण त्याचबरोबर त्या त्यांच्या सौंदर्य आणि साड्यांसाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच बरोबर कबीर बेदी हे देखील त्यांच्या काळातील सुपरहिट हिरो आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. दोघेही आजही खूप सक्रिय आहेत. 

जिथे रेखा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतील. त्याचबरोबर कबीर बेदी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी संबंधित अपडेट्स देत असतात. दोघांनी अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. दोघांचे चाहते आजही दोघांना पाहून खूप खूश आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT