Kareena Kapoor Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

याड याड! करीना अन् सैफचा 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

नुकताच करिनाने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची जोडी बॉलिवूडमधील टॉप कपल्सपैकी एक आहे. लोकांना ही जोडी केवळ पडद्यावरच नाही तर पडद्याबाहेरही पाहायला आवडते. बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक चित्रपटांमध्ये काम केलेली ही जोडी आजही चित्रपट निर्मात्यांची पसंती आहे. सध्या पती-पत्नी अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसत आहेत. नुकताच करिनाने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Kareena Kapoor Viral Video) शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये करिना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) पती सैफ अली खानही (Saif Ali Khan) आहे. या 35 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये या दोघांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. जिथे करीना खूपच सुंदर दिसून येत आहे. तोच सैफ अली खान त्याच्या खास स्टाइलमध्ये दिसला आहे. हा व्हिडिओ टाटा प्ले अॅड व्हिडिओ आहे जो, मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर यावर रणवीर सिंग (Ranveer Singh) सबा पतौडीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मजेशीर कमेंट्सही येत आहेत.

करीना कपूरने टाटा स्कायच्या जाहिरातीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, हा व्हिडिओ फार मोठा नसला तरी त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. एकीकडे करीना सैफकडून टाटा स्काय मागताना तिची रागीट शैली दाखवत आहे, तर दुसरीकडे सैफ तिला त्याच्या मजेशीर शैलीत तिला समजावताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये करिनाने एक मजेदार गोष्टही लिहिली आहे की, 'दिल में हुआ और जिंगलाला' 'कारण मी माझ्या 'सैफ स्पेस जी'मध्ये आहे. करीना सेफ ऐवजी सैफ लिहून तिने चांगलाच विनोद निर्माण केला आहे.

करिनाचा हा जाहिरातीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओला इंस्टाग्रामवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तिने पुढे कॅप्शनमध्ये लिहिले की, तुम्हाला माहित आहे का की टाटा स्काय आता टाटा प्ले आहे आणि तुम्हाला नेटफ्लिक्स देखील मिळेल. हॅशटॅग देऊन तुम्ही खेळा, कारण मनोरंजन झालं आणि झिंगालालाही. आणि तेही एकाच सब्सक्रिप्शन मध्ये. टाटा स्कायने आपले नाव बदलले आहे तसेच ग्राहकांसाठी अनेक नवीन गोष्टीही आणल्या आहेत.

करीना कपूर आमिर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा'मध्ये काम करत आहे. एप्रिलमध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. दुसरीकडे सैफ अली खान 'आदिपुरुष'मध्ये प्रभाससोबत लंकेशची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT