Raveena Tandon Dainik Gomantak
मनोरंजन

Raveena Tandon : "प्रत्येक नातं हे विश्वासावर आधारित असतं" अक्षय कुमारसोबतच्या संबंधांवर रवीना पुन्हा व्यक्त झाली?

Rahul sadolikar

रवीना टंडन...90 च्या दशकातलं एक असं नाव जे बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जायचं. रवीनाची तेव्हाची क्रेज इतकी होती की पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफही रवीनाचे चाहते होते.

आपल्या अभिनय आणि सौंदर्याने चर्चित असणारी रवीना एका प्रकरणामुळे चांगलीच प्रसिद्धीला आली होती. बरोबर खिलाडी अक्षय कुमारसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे. अतिशय संवेदनशील अशा या नात्याचा शेवट झाल्याने रवीना प्रचंड खचली होती.

रवीना विसरली नाही..

आजही रवीना अक्षयसोबतच्या तुटलेल्या नात्याला विसरलेली नाही. लेहरे रेट्रोला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रवीना नातेसंबंधांमधील तणाव आणि विश्वासघाताबद्दल खुलेपणाने बोलली आहे. 

या मुलाखतीत रवीना म्हणाली, “माझ्या मते प्रत्येक नाते हे विश्वास, प्रेम, प्रामाणिकपणा आणि विश्वासावर आधारित असते.” अक्षय कुमारबद्दलच्या रिलेशनशिपमध्ये होती त्याबद्दल तिला याच मुद्द्याबद्दल विचारले असता रवीना म्हणाली, “मी यावर चर्चा करणार नाही.” 

पती अनिल थडानीची आठवण

मुलाखतीदरम्यान रवीनाने हे देखील सांगितले की तिने आणि तिचा पती अनिल थडानी यांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल कशी चर्चा केली नाही आणि त्याच्यासोबतची तिची पहिल्या भेटीबद्दलही सांगितलं .

पती अनिल थडानी यांच्याबद्दल...

अनिल थडानी यांच्याबद्दल बोलताना रवीना म्हणाली माझ्या पतीने माझ्या भूतकाळाबद्दल कधीही चर्चा केली नाही आणि आणि मला त्यावर व्यक्त व्हायचे नव्हते, त्यामुळे मीही कधीच अशा चर्चा करण्याला प्राधान्य दिले नाही" ती म्हणाली आणि पुढे म्हणाली, "आम्ही भेटलो आणि ऑगस्टमध्ये बोलू लागलो आणि फेब्रुवारी 2004 पर्यंत आमचे लग्न झाले.

वेलकम टू द जंगल

रवीना टंडन सध्या वेलकम टू द जंगल ( वेलकम 3 ) मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात म आणि चित्रपट अक्षय-रवीनाच्या पुनर्मिलनासाठी कॉल करेल कारण दोन कलाकार त्यात दिसणार आहेत. या चित्रपटात संजय दत्त आणि सुनील शेट्टी देखील दिसणार आहेत. 

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT