Amul India : जवानने 1 हजार कोटींचा आकडा पार करताच अमुलने शेअर केलं शाहरुखचं अनोखं ॲनिमेटेड पिक्चर...

शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नुकताच 1 हजार कोटींचा आकडा पार केला असुन आता 'अमुल'ने शाहरुखचं आपल्या अनोख्या शैलीत अभिनंदन केलं आहे.
Amul India
Amul IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Amul India Shares Animated Picture After Jawan earns 1thousand crore : 7 सप्टेंबरला रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या जवानने एक बंपर ओपनिंग करुन आपणच बॉलीवूडचा बादशाह असल्याचं सिद्ध केलं आहे.

चित्रपटाने कमाईचे नवे नवे उच्चांक गाठत आता थेट 1 हजार कोटींचा पल्ला गाठला आहे.

चाहत्यांनी तर शाहरुखच्या यशासाठी कौतुक केलं आहेच ;पण आता अमुल इंडियानेही एक ॲनिमेटेड पिक्चर शेअर करत अभिनंदन केलं आहे. अमूलने या पिक्चरसोबत कॅप्शनमध्ये 'जवान'चा दिग्दर्शक ॲटलीचंही कौतुक केलं आहे.

जवान... बटरली डिलिशियस

काही काळापूर्वी, अमूल इंडिया या लोकप्रिय डेअरी ब्रँडने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा आकडा पार केल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी शाहरुख खानच्या जवानाच्या पात्राचे ॲनिमेटेड पिक्चर पोस्ट केले आहे . 

या ॲनिमेटेड पिक्चरवर टेक्स्ट होता, "Jawan Thousand Crores ! Amul Atlee Butterly Delicious."  

'जवान'ची स्टारकास्ट

शाहरुख खान, नयनतारा  आणि  विजय सेतुपती या मुख्य कलाकारांशिवाय चित्रपटातील कलाकारांमध्ये सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि योगी बाबू यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि संजय दत्त यांनी विशेष भूमिका साकारल्या होत्या.

'जवान'नंतर आता 'डंकी'

दरम्यान, शाहरूख पुढच्या काळात राजकुमार हिरानीच्या डंकीमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार , “डंकी 21 डिसेंबरला रिलीज होण्याची शक्यता आहे.

Amul India
HBD Ranbir Kapoor : आलियाने लाडक्या पतीचा वाढदिवस असा साजरा केला...

जास्तीत जास्त तोंडी शब्द वापरणे आणि शुक्रवार ते रविवार या पारंपारिक वीकेंडसाठी प्रेक्षकांना उत्तेजित करणे ही कल्पना आहे. 

आंतरराष्ट्रीय पट्ट्यांमध्ये SRK हे सर्वात मोठे भारतीय नाव आहे आणि जागतिक सुट्ट्यांच्या समर्थनासह, डंकी ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये येण्यापूर्वी चार दिवसांच्या वीकेंडच्या कालावधीत अकल्पनीय संख्या करेल." 

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com