Ratna Pathak Shah-Naseeruddin Shah Dainik Gomantak
मनोरंजन

Ratna Pathak Shah: 'नसिरुद्दीन शहा यांचे पहिले लग्न...;' रत्ना पाठक शहा यांचा खुलासा

Ratna Pathak Shah: रत्ना पाठक शाह यांच्याशी विवाह करण्यापूर्वी नसीरुद्दीन शाह यांचे आधी एक लग्न झाले होते.

दैनिक गोमन्तक

Ratna Pathak Shah: अभिनेत्री रत्ना पाठक शहा आपल्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री आहेत. धाडसी भूमिका साकारताना त्या आपल्या अभिनयाने त्या व्यक्तीरेखेला जिवंत करतात. त्या जशा धाडसी भूमिकांसाठी ओळखल्या जातात, तशाच त्या आपल्या धाडसी विधानांसाठी, सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. आता त्या 'धक धक' या त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहेत.

आता एका मुलाखतीदरम्यान, त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. त्यांनी नसिरुद्दीन शहा यांच्या पहिल्या पत्नीबद्दल, त्यांच्या अफेअरबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.

नसरुद्दीन शहा आणि रत्ना पाठक यांची ओळख

रत्ना पाठक म्हणतात की, नसीरुद्दीन शाह एकत्र एक नाटक करत होते. त्या नाटकाचे 'संभोग से संन्यास तक' असे नाव होते. आपण एकमेकांच्या सहवासात राहू शकतो अशी जाणीव झाल्याने आम्ही लग्नाचा विचार केला.

रत्ना पाठक शाह यांच्याशी विवाह करण्यापूर्वी नसीरुद्दीन शाह यांचे आधी एक लग्न झाले होते. परवीन मुराद उर्फ ​​मन्नारा सिक्री यांच्याशी त्यांनी लग्न केले होते. पण नंतर नसीरुद्दीनने रत्ना पाठकशी लग्न केले. त्यावेळी नसीरुद्दीन आपल्या पहिल्या पत्नीपासून बरेच दिवस वेगळे राहू लागले होते.

नसीरुद्दीनच्या भूतकाळाशी तिचा काहीही संबंध नसल्याचे रत्नाने सांगितले. ती म्हणाली, 'माझा त्याच्या मागील आयुष्याशी काहीही संबंध नाही. आम्ही प्रेमात पडलो होतो. तो आपल्या पहिल्या पत्नीपासून बराच काळ वेगळा राहत होता. त्यादरम्यान त्याचे अनेक संबंध होते. तीही आता भूतकाळाची गोष्ट झाली आहे. मग मी त्याच्या आयुष्या( Life )त आले. जोपर्यंत मी त्याच्या आयुष्यात शेवटची आहे तोपर्यंत मी ठीक आहे. मला काही हरकत नाही.'

रत्ना पाठक शाह यांनी सांगितले की, नसीरुद्दीन शाहसोबतचे तिचे लग्न इतर लग्नांसारखे नव्हते. लग्नाच्या एका आठवड्यानंतर, ती आणि नसीरुद्दीन शाह हनीमूनला गेले होते, पण मध्येच परतले. रत्ना पाठक शाह म्हणाल्या, 'नसीरने 'जाने भी दो यारों'चे शूटिंग सुरू केले आणि त्यानंतर बरेच दिवस मी त्याला पाहिले नाही.नसीर जायचा आणि तीन दिवसांनी परत यायचा आणि तो जिवंत आहे, मेला आहे की कुणासोबत पळून गेला आहे हे मला माहीत नव्हते. तेव्हा खरंच हा सगळा वेडेपणा होता.

नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक शाह यांचा विवाह 1982 मध्ये झाला. लग्नानंतर रत्ना आणि नसीर हे दोन मुलांचे पालक झाले. सुरुवातीला रत्ना पाठक शहा यांच्या कुटुंबाचा विरोध होता. त्याचे आधी लग्न झाल्याने हा विरोध होता. मात्र हा विरोध मावळत गेला पण नंतर त्यांनी होकार दिला.

दरम्यान, रत्ना पाठक शहा आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन( Entertainment ) करताना दिसतात. आता त्यांच्या नवीन चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT