Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

सीमा पार रणवीरची एन्ट्री! कराचीच्या रस्त्यांवर केलं गुपचूप शूटिंग, पाकिस्तानी नागरिक झालेत 'येडे'; केला अजब दावा Watch Video

Viral Video: बॉलीवूडचे चित्रपट आणि त्यातील भव्यता नेहमीच चर्चेचा विषय ठरते. मात्र, सध्या एका आगामी चित्रपटाने चक्क सीमेपलीकडे पाकिस्तानात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

Sameer Amunekar

बॉलीवूडचे चित्रपट आणि त्यातील भव्यता नेहमीच चर्चेचा विषय ठरते. मात्र, सध्या एका आगामी चित्रपटाने चक्क सीमेपलीकडे पाकिस्तानात मोठी खळबळ उडवून दिली आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांचा आगामी चित्रपट ‘धुरंधर-२’ (Dhurandhar) मधील काही दृश्ये पाहून एका पाकिस्तानी तरुणाने असा काही दावा केला आहे, जो ऐकून भारतीय नेटकरी आपले हसू रोखू शकत नाहीत. या तरुणाच्या मते, रणवीर सिंहने चक्क कराचीच्या गल्ल्यांमध्ये येऊन गुपचूप शूटिंग उरकले आहे!

चित्रपटाच्या तांत्रिक कौशल्याचा हा एक उत्तम नमुनाच म्हणावा लागेल की, ‘धुरंधर’च्या मेकर्सनी कराचीमधील 'ल्यारी' या भागाचा हुबेहूब सेट थायलंडमधील बँकॉक येथे उभारला होता. चित्रपटात हा भाग इतका वास्तववादी दिसला की, पाकिस्तानातील लोकांना वाटू लागले की त्यांच्याच शहरात चित्रीकरण झाले आहे. विशेषतः ल्यारीमधील प्रसिद्ध 'चील चौक' पडद्यावर पाहून तिथल्या एका तरुणाचा पारा चढला आणि त्याने थेट सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अजब खुलासे केले.

"रणवीर पहाटे ४ वाजता यायचा..." तरुणाचा अजब दावा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा तरुण अत्यंत गंभीरपणे सांगत आहे की, आदित्य धर आणि रणवीर सिंह आपली संपूर्ण टीम घेऊन पहाटे ४ वाजता ल्यारीमध्ये येत असत. त्याचे कारण सांगताना तो म्हणतो की, "तेव्हा लोक झोपलेले असायचे, म्हणून कोणाला कळले नाही." इतकेच नाही तर, तिथल्या काही वृद्धांनी रणवीरला प्रत्यक्षात शूटिंग करताना पाहिले असल्याचा दावाही त्याने केला आहे. पुढे त्याने धमकीवजा इशारा दिला की, "जर ही टीम रात्री १० वाजता आली असती, तर आम्ही त्यांना सोडले नसते." या तरुणाचा लॉजिक आणि त्याचा आत्मविश्वास पाहून नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच फिरकी घेतली आहे.

भारतीय नेटकऱ्यांकडून 'फुल' मनोरंजन

हा व्हिडिओ @choga_don या एक्स (ट्विटर) हँडलवरून व्हायरल होताच भारतीयांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. "भावा, थोडी कमी घेत जा!" अशा उपहासात्मक कमेंट्ससह लोक या तरुणाच्या अज्ञानाची मजा घेत आहेत. "बँकॉकला कराची समजणे हेच आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाचे मोठे यश आहे," असे मत काही युजर्सनी मांडले आहे. एकूणच, चित्रपटाचा ट्रेलर किंवा सीन्स येण्यापूर्वीच या पाकिस्तानी तरुणाच्या दाव्याने 'धुरंधर'ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT