Ranveer singh Dainik Gomantak
मनोरंजन

Ranveer Singh :कॉमेंटेटरने रणवीर सिंहला "तू कोण? असे विचारताच रणवीरने दिले हे उत्तर...

अभिनेता रणवीर सिंहला कोण नाही ओळखत? पण एका कॉमेंटेटरने त्याला तु कोण? असा प्रश्न विचारला आहे...

Rahul sadolikar

अभिनेता रणवीर सिंग अलीकडेच अबू धाबी ग्रँड प्रिक्समध्ये सहभागी झाला होता, तेव्हा त्याला समालोचक मार्टिन ब्रंडलने कॅमेरावर बाईट घेण्यासाठी काही प्रश्न विचारले आणि तेव्हाच एक्स रेसिंग ड्रायव्हर मार्टिन ब्रंडलने कबूल केले की तो सिंग कोण आहे हे विसरला होता.

पण अत्यंत हुषारीने आणि कसलाही इगो न दाखवता रणवीर सिंहने त्या क्षणी नेमकं उत्तर दिलं ज्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. काय होता हा प्रसंग चला समजुन घेऊया..

शनिवारी फिल्मफेअरच्या सोहळ्यानंतर रविवारी रणवीर अबुधाबी शहरात सुरु असणाऱ्या ‘२०२० अबुधाबी ग्रँड प्रिक्स’ या फॉर्मूला १ रेसिंग कारच्या स्पर्धेच्या ठिकाणी गेला.साहजिकच नेहमीप्रमाणे रणवीर अतरंगी कपडे परिधान करुन ही भव्यदिव्य स्पर्धा पाहायला गेला. स्पर्धेच्या ठिकाणी एफ १ रेसिंग क्षेत्रामधील अनेक मान्यवर उपस्थित होते.

तेथे रणवीर मार्टिन ब्रंडल (Martin Brundle) या एफ १ रेसिंगमधील दिग्गज खेळाडूला भेटला. तेव्हा त्यांनी रणवीरला “तुला कसं वाटतं आहे?” असा प्रश्न केला. त्यावर त्याने “मी आता जगाच्या सर्वोच्च स्थानावर आहे असे वाटतंय. मी खूप आनंदी आणि उत्साही आहे”, असे उत्तर दिलं.

पुढे मार्टिन त्याला म्हणाले, “मी क्षणभरासाठी ‘तू कोण आहेस’ हे विसरलोय.” आता असा प्रश्न एखाद्या सेलिब्रिटीला विचारणं म्हणजे त्याचा अपमान समजला जातो त्यांचं बोलणं ऐकून रणवीर नम्रपणे म्हणाला, “सर मी बॉलिवूड सिनेसृष्टीमधील अभिनेता आहे. मी मूळचा मुंबईचा आहे, भारतीय आहे. मी एक एन्टटेनर आहे.”

या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. रणवीरच्या विनम्र उत्तराचे नेटकरी खूप कौतुक करत आहेत. या प्रकरणावरुन मार्टिन ब्रंडल मात्र सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT