'चिकनी चमेली' या गाण्यावर थिरकला रणवीर सिंग, पहा व्हिडिओ  Instgram/@katrinakaif and ranveersingh
मनोरंजन

'चिकनी चमेली' या गाण्यावर थिरकला रणवीर सिंग, पहा व्हिडिओ

कलर्स टीव्हीने सोशल मिडियावर द बिग पिक्चर शोच्या आगामी भागांचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. हा एपिसोड दिवाळी स्पेशल असणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) टीव्हीवर (TV) धमकेदार एंट्री केली आहे. त्याचा 'द बिग पिक्चर' (The Big Picture) हा शो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्याच्या शोमध्ये या दिवाळी स्पेशल (Diwali Special) एपिसोडमध्ये खास पाहुणे येणार आहे. या एपिसोडमध्ये सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी ( Rohit Shetty) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) 'द बिग पिक्चच्या मंचावर दिसणार आहेत. रणवीर सिंग या दोघासोबत खूप मस्ती करतांना दिसणार आहे. त्याचा रिलीज झालेला प्रोमो पाहता हा एपिसोड खूपच मजेशीर असणार आहे असे वाटत आहे.

कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर द बिग पिक्चर शोच्या आगामी एपिसोडचा व्हिडिओ शेअर केलाआहे. हा आगामी एपिसोड दिवाळी स्पेशल असणार आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रोहित शेट्टी रणवीर सिंगला आज कोण उत्तम डान्सर आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत आहे. रणवीर सिंगने हे आव्हान स्वीकारले आहे. रणवीर आणि कतरिना यांच्यामध्ये डान्स करण्याचे चॅलेंज पाहायला मिळत आहे.

सर्वात पहिले या दोघांनी रणवीरच्या 'गोलियों की लीला राम-लीला' या चित्रपटमधील गाण्यावर डान्स केला. त्यानंतर कतरीनाच्या 'चिकनी चमेली' या गाण्यावर थिरकतांना दिसत आहे. रणवीर कतरिनाच्या स्टेप्स कॉपी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT