Ranveer Singh and Alia Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

Baiju Bawra: बैजू बावरामधून आलीया भट्ट आणि रणवीर सिंह यांना घरचा रस्ता?

Baiju Bawra: संजय लीला भन्साळींचा हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Baiju Bawra: बॉलीवूडच्या विश्वातील संजय लीला भन्साळी हे दिग्दर्शनातील मोठे नाव मानले जाते. आजपर्यत त्यांनी पद्मावत, बाजीराव मस्तानी, देवदास, गंगुबाई काठियावाडी यासारख्या अनेक मोठ्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

आता त्यांचा आगामी चित्रपट बैजू बावरा चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून बैजू बावरा या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलीया भट्ट यांना लीड रोलसाठी घेणार असल्याची बातम्या व्हायरल होत होत्या.

आता यावर असे म्हटले जात आहे की, बैजू बावरासाठी रणवीर सिंह आणि आलीया भट्ट बाबत व्हायरल झालेल्या बातम्या खोट्या आहेत. बैजू बावराच्या कास्टिंगबाबत अजून काहीही कंफर्म झाले नसल्याची माहीती समोर आली आहे.

चित्रपटाशी संबंधित सूत्राने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, बैजू बावराच्या कास्टिंगबाबत व्हायरल झालेल्या बातम्या चूकीच्या आहेत. संजय लीला भन्साळींचा हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे.

फक्त संजय लीला भन्साळींना माहीत आहे की चित्रपटातील भूमिकांसाठी कोण योग्य आहे आणि ज्या कुणाची त्यांनी कल्पना केली आहे ती त्यांच्या डोक्यात आहे.

बैजू बावराच्या कास्टिंगबाबत मिळालेल्या या नवीन माहीतीनंतर आलीय भट्ट आणि रणवीर सिंह यांना चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amazon Saleमध्ये iPhone 16 वर मोठी बचत; 18 हजारांपर्यंत स्वस्त मिळणार Appleचा फोन, ऑफरचा 'असा' घ्या फायदा

ICC ODI Rankings: आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा; टॉप-10 मध्ये 4 खेळाडू, केएल राहुलची मोठी झेप

FC Goa ISL Squad: एफसी गोवाचा 'आयएसएल' संघ जाहीर; शनिवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध पहिली लढत

Goa Fish Market: म्हापसा मासळी मार्केटला मुख्यमंत्र्यांची अचानक भेट; विक्रेत्यांच्या समस्यांवर आठवडाभरात उपायांचे निर्देश

Goa Tuber Vegetables Market: कंदमुळांना आता 'भाव' येणार! आवक घटली; पाऊस आणि रानटी जनावरांचा उत्पादनाला फटका

SCROLL FOR NEXT