Rakul Preet Singh: अडीच मिनिटांचा सीन, एक महिन्याची मेहनत; रकुलने सांगितला अंडरवॉटर शूटचा किस्सा

Rakul Preet Singh: पाण्यातल्या क्लोरिनमुळे डोळ्यांची जळजळ होत असते.
Rakul Preet Singh
Rakul Preet SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Rakul Preet Singh: बॉलीवूडची अभिनेत्री रकूल प्रीत सिंग ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलिकडच्या काही काळात रकुल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. आता मात्र आय लव यू या तिच्या आगामी चित्रपटातील तिच्या भूमिकेची चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, चित्रपटाच्या एका सीनमध्ये रकुलने पाण्यात 2 मिनिट 30 सेकेंद पाण्यात राहण्याची आवश्यकता होती, त्यासाठी तिने कशी तयारी केली याबद्दल रकुलने आपले अनुभव शेअर केले आहेत.

रकुल म्हणते, चित्रपटाच्या कहानीच्या भावनांची खोली समजून घेण्यासाठी मला एका खास प्रकारच्या विचारपद्धतीची गरज होती . या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी एक महिन्याची तयारी केली आहे.

Rakul Preet Singh
Ajmer 92 Film: लडकी चीज ही ऐसी है... अजमेर दर्ग्याचे खादिम सरवर चिश्ती यांचं वादग्रस्त वक्तव्य; Video

पाण्याच्या आतील सीन शूट करण्यासाठी जहान एडेनवाला यांच्याकडून मी ट्रेनिंग घेतले आहे. अंडरवॉटर सीन शूट करण्याची सर्वात मोठे आव्हान हे होते की, मी दुपारी 2 ते 4 या वेळेत पाण्यात असायचे, महत्वाचे म्हणजे पाणी खूप थंड होते.

प्रत्येक शॉटनंतर माझ्या शरीरावर गरम पाणी टाकले जायचे. पाण्यातल्या क्लोरिनमुळे डोळ्यांची जळजळ होत असते. मात्र तरीही हे आव्हान मी आनंदाने स्विकारले आणि त्यामुळे मला स्वत:ला पुढे जाण्यास मदत झाली असे रकुलने आपल्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mahikavati Bakhar History
Goa Road Accident Death
Rajnath Singh Goa Visit August 25
Virendra Singh Baisoya Drug Mafia Deported Dubai
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com