IFFM 2022: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून खंडीत झालेला भारतीय चित्रपट महोत्सव यंदा मेलबर्नमध्ये होणार आहे. आणि या वर्षी हा फेस्टिवल प्रत्यक्षात होणार आहे. हा महोत्सव 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान मेलबर्न येथे होणार आहे. उद्घाटन समारंभ 12 ऑगस्ट रोजी तर वार्षिक पुरस्कार सोहळा 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. या महोत्सवात रणवीर सिंगचा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट '83' जोरदार गाजणार आहे, तर ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू कपिल देव या फेस्टिवलचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Indian Film Festival of Melbourne)
खेळ आणि सिनेमाशी लोकांचा भावनिक संबंध
भारताचे माजी कर्णधार कपिल देव म्हणाले की, 'मी IFFM 2022 चा भाग होण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट चित्रपट साजरे करण्याचे हे व्यासपीठ आहे. क्रीडा आणि सिनेमा हे केवळ भारतीयांसाठीच नाही तर विविध समुदाय आणि देशांसाठी दोन प्रमुख सांस्कृतिक अनुभव आहेत जे आपल्याला एकत्र आणतात. खेळ अनेक दशकांपासून लोकांना एकत्र आणत आहेत. खेळ आणि सिनेमा या दोन्हींशी लोकांचा भावनिक संबंध असतो.'
प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
IFFM 2022 संचालक मितू भौमिक लांगे म्हणाले की, 'या वर्षी एक रोमांचक व्हर्च्युअल प्रोग्रामिंगसह IFFM पुन्हा प्रत्यक्ष पाहण्यात आम्हाला खूप आनंद झाला आहे. दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना त्यांच्या 83व्या विश्वचषक विजयावर आधारित चित्रपटात सन्मानित करण्यासाठी, आम्ही त्यांना मेलबर्नमध्ये पाहण्यास उत्सुक आहोत. हे चित्रपटसृष्टी आणि क्रिकेटप्रेमींचे शहर असल्याने प्रेक्षक त्यांना येथे पाहण्यास उत्सुक असतील याची आम्हाला खात्री आहे. यावर्षी 23 भाषांमधील 100 हून अधिक चित्रपट महोत्सवासाठी निवडले गेले आहेत, अशी माहिती लांगे यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.