Ranveer Singh and Deepika Padukone Dainik Gomantak
मनोरंजन

दीपिकासाठी रणवीरने केला भन्नाट डान्स

दैनिक गोमन्तक

रणवीर सिंगने (Ranveer Singh) त्याची आई अंजू भवानीच्या (Anju Bhavani) वाढदिवसानिमित्ताने योजलेल्या पार्टीत दीपिका पदुकोणसाठी (Deepika Padukone) 'नशे सी चढ़ गई' या गाण्यावर ठेका धरला. रणवीर सिंग हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे. हे आपण त्याच्या प्रत्येक चित्रपटातून बघितलेच असेल. रणवीर सिंगकडे अभिनया सोबतच नृत्य कौशल्य देखील आहे. रणवीर सिंग हा एक बहिर्मुख व्यक्तिमत्व असून तो आपली कला दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. रविवारी, रणवीर सिंग हा पत्नी-अभिनेत्री दीपिका पदुकोणसह त्याची आई अंजू भवानीच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहिल्या होत्या, तेव्हा हा डॅशिंग मुलाने त्याच्या काही हिट ट्रॅक वर रिदम धरून पार्टीमध्ये जान आणली.

रणवीरने त्याची आई अंजू भवनानी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत आपले केस समोर घेऊन डान्स करतेला व्हिडीओ समोर आला आहे. एका व्हिडीओमध्ये रणवीर दीपिकासाठी डान्स करताना तो बेफिक्रेच्या वेषात आणि फाटलेल्या डेनिममध्ये दिसत आहे.

रविवारी, रणवीर आणि दीपिका वाढदिवसाच्या पार्टीसाठी मुंबईमधील हॉटेलमध्ये जातानाचे काही फोटो प्रसिध्द झाले होते. कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यापूर्वी, रणवीर त्याची आई आणि दीपिका सर्वांनी शटरबग्ससाठी पोज दिली होती. त्याठिकाणी रणवीर सिंग यांच्या पप्पांनी अंजूसाठी 'बार बार दिन ये आये' गायले आणि रणवीरही त्यांच्यात सामील झाला होता.

यावेळी दीपिका पदुकोणने रफल्ड रेड टॉप आणि ब्लॅक लेदर लेगिंग्जमध्ये दिसून आली तर रणवीरने फाटलेली जीन्स आणि डेनिम जॅकेट घातले होते. फ्रंटवर्कवर, रणवीर आणि दीपिका पुढे या पुढे कबीर खान दिग्दर्शित स्पोर्ट्स ड्रामा '83' मध्ये दिसतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT