15 ऑगस्ट रोजी तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तेथून अनेक आश्चर्यकारक आणि धक्कादायक चित्रं समोर येत आहेत. याचबरोबर, त्या देशातून आपला जीव वाचवून स्थलांतर करणाऱ्या लोकांनी तेथील भयानक दृश्याचे किस्सेही कथन केले आहेत.
अलीकडेच अफगाणिस्तानची (Afghan pop star Aryana Sayeed) पॉप स्टार आर्यना सईदही (Aryana Sayeed) तालिबानियांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली. त्याचवेळी, तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, तालिबान आणि पाकिस्तानबद्दल (Pakistan) अनेक आश्चर्यकारक गोष्टीचा खुलासा सोशल मिडियावरून (Social Media) केला आहे.
पाकिस्तानने तालिबानला सशक्त केले आहे
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आर्यना म्हणाली की, "मी सर्व दोष पाकिस्तानला देते. वर्षानुवर्षे, आम्ही तालिबानच्या बळकटीकरणामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध करणारे व्हिडिओ आणि पुरावे पाहिले आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा आमचे सरकार एखाद्या तालिबान्याला पकडायचे, तेव्हा तपासणीदरम्यान हे लक्षात आले की ते पाकिस्तानी व्यक्ती असायचे. यावरून हे स्पष्ट होते की, पाकिस्तानमुळेच तालिबानने अनेक ठिकाणी आपली दहशत निर्माण केली आहे."
सोशल मीडियावर दिली माहिती
आर्यना सईदने पुढे असेही सांगितले की, ती गुरुवारी काबूलहून निघाली होती. सोशल मिडियाच्या माद्यमातून तिने ही माहीती आपल्या चाहत्यांना दिली. आर्यना सईदचे इंस्टाग्रामवर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांना माहिती देतांना,"मी बरी आहे आणि काही रात्रीनंतर मी दोहा, कतार येथे पोहोचली आहे. आणि आता इस्तंबूलला जाण्यासाठी फ्लाइटची वाट पाहत आहे," असे सांगितले.
आर्यना तालिबानी कायद्याचे पालन करत नाही
आर्यना सईदने अफगाणिस्तानमध्ये राहत असतांना कधीही हिजाब घातला नव्हता. ती एक महिला असूनही स्टेडियममध्ये गाणे गात शिरली होती जे तालिबानियांच्या राजवटीत शक्य नाही. आर्यनाने जे कृत्य केले ते तालिबान कायद्याच्या विरोधात आहे. यावर, एका मानवाधिकार कार्यकर्त्याने ट्वीट करून केले आणि त्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, "2015 मध्ये आर्यना सईदने 3 निषिद्ध मोडल्या: 1-एक महिला म्हणून गाणे, 2-हिजाब न घालणे, 3-महिला असून स्टेडियममध्ये प्रवेश करणे, तीचे हे कृत्य आता एका स्वप्नात बदलले आहे. "
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.