Rani Mukerji as & in Mrs Chatterjee Vs Norway Dainik Gomantak
मनोरंजन

Mrs Chatterjee Vs Norway : "माझ्या संपूर्ण आयुष्यात असं कधीही"....आगामी चित्रपटाच्या ट्रेलरवर राणी मुखर्जी काय म्हणाली?

'राणी मुखर्जी'ने तिच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरवर एक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Rahul sadolikar

Mrs Chatterjee Vs Norway: अभिनेत्री राणी मुखर्जी ही तिच्या अष्टपैलू अभिनयासाठी नेहमीच प्रेक्षक आणि समीतक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरली आहे. ब्लॅक चित्रपटात तिने साकारलेली आंधळ्या मुलीची भूमीका असो किंवा मेनस्ट्रीम सिनेमा असो राणीने नेहमीच कथानक आणि आपल्या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

राणी मुखर्जी आपल्या प्रत्येक चित्रपटात आपल्या फॅन्ससाठी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असते. आता तिचा मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघुन राणी भारावुन गेली आहे.

मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वेच्या ट्रेलरला मिळालेल्या उदंड प्रतिसादावर राणी मुखर्जीने आता प्रतिक्रिया दिली आहे. ट्रेलरवरील प्रतिक्रिया तिच्यासाठी खूप खास आणि जबरदस्त आहेत. 

जगभरातील चाहत्यांनी, तिच्या सहकाऱ्यांनी, मित्रमंडळींनी आणि कुटुंबियांनी केलेले प्रेम पाहून नम्रपणे राणी म्हणाली की, तिच्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच तिच्या कामावर लोकांचं इतके प्रेम पाहायला मिळत आहे. 

तिने सांगितले की, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना ब्लॅक या चित्रपटासाठी तिला शेवटच्या वेळी असा प्रतिसाद मिळाला होता . राणी म्हणाली की ट्रेलरसाठी अशी सगळ्यांची प्रतिक्रिया येणं दुर्मिळ आहे आणि फक्त ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांचे डोळे पाणावतात हे ऐकून बरं वाटतंय.

राणी मुखर्जी पुढे म्हणाली की, "लोक एका आईच्या असहाय्य परिस्थितीशी जोडले जातायत चित्रपटाची गोष्ट खरी आहे हे पाहून ते आश्चर्यचकित झाले आहेत. मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पाहत आहे आणि आशा आहे की मिसेस चॅटर्जी Vs नॉर्वे मधील डेबिकाचा प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षक खरोखरच उत्सुक असतील" . 7 मार्च 2023 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

Power Outages in Goa: गोव्‍यात दिवसाला 37 वेळा वीजपुरवठा खंडित, पहा Video

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

SCROLL FOR NEXT