सध्याच्या आधुनिक जगात टेलिव्हिजन पाहणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आज आपण टिव्हीवर जे कार्यक्रम पाहतो ते एकेकाळी ब्लॅक अॅन्ड व्हाइट असायचे. त्यानंतर तंत्रज्ञान युगात झालेल्या बदलांमुळे टिव्हीमध्येही (TV) अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. आधी एखाद्या डब्ब्याप्रमाणे दिसणारा हा टिव्ही आता अगदी स्लिम-ट्रिम झाला आहे. येणाऱ्या काळात टिव्ही हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम होणार याची जाणीव लोकांना 1996 मध्येच झाली होती. कारण त्याच वर्षी 21 नोव्हेंबर पासून 'वर्ल्ड टेलिव्हिजन डे' साजरा केला जातो.
जागतिक दूरदर्शन दिनाचा इतिहास
पहिला जागतिक दूरचित्रवाणी मंच 21 नोव्हेंबर 1996 रोजी झाला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने हा दिवस जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणून घोषित केला. 1996 मध्ये संयुक्त राष्ट्राकडून पहिली वर्ल्ड टेलिव्हिजन फोरम बोलावण्यात आली होती. यामध्ये जगभरातील टिव्ही इंडस्ट्रीतील प्रमुख लोक सहभागी झाले होते. सर्वांनी वैश्विक राजनिती आणि डिसिजन मेकिंगमध्ये टेलिव्हिजनच्या सहभागाविषयी चर्चा केली. यावेळी सर्वांनी असा निष्कर्ष काढला की, समाजात दिवसागणिक टिव्हीचे महत्त्व वाढत आहे. यानंतर संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंबलीने 21 नोव्हेंबर रोजी 'वर्ल्ड टेलिविजन डे' घोषित करण्यात आला. हा निर्णय वैश्विक सहकार्य वाढविण्यासाठी टेलिव्हिजनचे योगदान वाढविण्यासाठी घेण्यात आला होता.
जागतिक दूरदर्शन दिनाचे महत्त्व
लोकांच्या मनोरंजनाबरोबरच कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी टेलिव्हिजनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दूरदर्शन हे माहिती आणि शिक्षणाचे प्रमुख स्त्रोत आहे. तसेच ते लोकांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरदेखील प्रभाव टाकते.
कारण टेलिव्हिजन जगात घडणाऱ्या घडामोडींकडे लक्ष वेधून घेते. जागतिक टेलिव्हिजन दिन देखील समाजावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या समस्या आणि घटनांबद्दल नि:पक्षपाती माहिती प्रदान करण्यासाठी, दूरचित्रवाणी माध्यमांच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सरकार, संस्था आणि व्यक्तींच्या भूमिकेचे कौतुक करण्यासाठी साजरा केला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.