Randeep Hooda in Cops Role
Randeep Hooda in Cops Role Dainik Gomantak
मनोरंजन

Randeep Hooda in Cops Role : आता हा अभिनेता दिसणार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमीकेत...

Rahul sadolikar

वास्तविक जीवनातील व्यक्तिरेखेवर आधारित वेबसिरीज, सत्यता आणि नाट्य यांच्यात समतोल राखावा लागतो. रणदीप हुड्डा आणि दिग्दर्शक नीरज पाठक यांच्या आगामी वेबसिरीजमध्ये आपल्याला हे पाहायला मिळेल. इन्स्पेक्टर अविनाश हा रोल सध्या रणदीप हूडाच्या आगामी वेबसिरीजमधला आहे.

या चित्रपटात उत्तर प्रदेशातील माफियांचे वर्चस्व आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलीस अधिकारी अविनाश मिश्रा यांनी 90 च्या दशकात केलेल्या प्रयत्नांची गोष्ट सांगितली आहे. JioCinema च्या पहिल्याच वेब सिरीजमध्ये रणदिप हूडा सुपर कॉपच्या भूमीकेत दिसेल

रणदिप हूडा सुपर कॉपच्या भूमीकेत

पाठक म्हणतात की अविनाश मिश्रांसोबतच्या नियमित भेटीमुळे त्यांना त्यांच्या जगाचा शोध घेता आला आणि त्यांचं पात्र लिहिलं . दिग्दर्शक नीरज पाठक म्हणतात “अविनाश-जींनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले जेव्हा ते स्क्रिप्टिंगसाठी आले. ते म्हणाले, 'मी तुला माझी गोष्ट सांगितली आहे. आता तुला जी रील कथा सांगायची आहे ती तू लिही.' कथा इंन्स्पेक्टर अविनाश यांची आहे, परंतु त्यात इतर बरीच महत्त्वाची पात्रे आहेत,”
या काळात रणदिप हूडाला मिश्रा यांची, देहबोली आणि भाषेचा अभ्यास करता आला. रणदीप म्हणतो “मला नेहमीच वेगवेगळे उच्चार करणे, भाषा बोलणे आवडते आणि ते माझ्या भूमिकांमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. अविनाश-जींची बोलण्याची खास शैली आहे; त्याचा मजबूत पण गोड आवाज आणि यूपीचा टोन आहे , जो मला खूप आवडला,”.

अविनाश मिश्रा यांची सेटवरची उपस्थिती

टीमने लखनौमध्ये मोठ्या प्रमाणावर शूटींग केल्यामुळे, मिश्रांच्या सेटवरील उपस्थितीने रणदीपची मदतच झाली. दिग्दर्शकाला घटनांची माहिती देण्यापासून ते रणदीप हुडाला त्याच्या बोलीभाषेवर अभ्यासात मदत करण्यापर्यंत या चित्रपटात मिश्रा यांनीही मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे.

नीरज पाठक म्हणतात

दिग्दर्शक पुढे म्हणतात, “अविनाश-जीचा लेहजा, बोलण्याची पद्धत वेगळी आहे. जेव्हा ते रणदीप त्याच्या भूमीकेत असताना भेटले तेव्हा ते म्हणाला, 'ये तो हमसे भी अच्छा कर रहा है.'” या मालिकेत अमित सियाल आणि उर्वशी रौतेला यांच्याही भूमिका आहेत . 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: विजय सरदेसाई यांनी काँग्रेस का सोडली? मनोज परब यांचा सवाल

Harmal News : डबल इंजीन सरकारमुळेच विकास : दयानंद सोपटे

Lok Sabha Elections 2024: वोट फॉर काँग्रेस; दिल्लीत यासिन मलिकसोबत मनमोहन सिंग यांचे पोस्टर कोणी लावले?

सोनीनं लॉन्च केलं फ्युचरिस्टिक 'वेअरेबल एअर कंडिशनर' गॅझेट! जाणून काय आहे खासियत

Colva Road Tree Cutting : कोलवा मार्गावरील प्रकार; फांद्या छाटण्‍याच्‍या नावाखाली झाडांची कत्तल

SCROLL FOR NEXT