Ranbir Kapoor Shamshera
Ranbir Kapoor Shamshera  Twiteer
मनोरंजन

Shamshera Teaser: रणबीरच्या 'शमशेरा' चा दमदार ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज

दैनिक गोमन्तक

रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त यांचा बहुचर्चित चित्रपट 'शमशेरा' चे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या काही दिवसांपूर्वी आलेल्या रणबीर कपूरच्या लूकने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले होते, तर आता 'शमशेरा'चा टीझरही तुम्हाला थक्क करणार आहे. या टीझरची सुरुवात संजय दत्तच्या लूकने होत आहे, जो खाकी वर्दी, लाँग टॉपमध्ये सामान्य लोकांचावर अत्याचार करतांना दिसत आहे. त्याचवेळी घोड्यावर स्वार झालेला 'डाकू' रणबीर कपूरची एन्ट्री तुम्हालाही हादरवून टाकेल. (Shamshera Trailer Realese Date news)

शमशेराचा दमदार टीझर

'शमशेरा'च्या या टीझरमध्ये तुम्हाला चित्रपटातील दमदार संवादही ऐकायला मिळणार आहेत. त्याचवेळी रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) आवाजातील 'कर्म से डाकू, धर्म से आझाद' या डायलॉगमुळे रणबीर संजय दत्तच्या अत्याचारातून आपली सुटका करून घेण्यासाठी एक डाकू म्हणून लोकांसमोर येणार असल्याचे स्पष्ट करतो. चित्रपटाचा टीझर खूपच दमदार आहे. हा टीझर शेअर करताना वाणी कपूरने (Vani Kapoor) 'शमशेरा'च्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केली आहे.

शमशेराचा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

'शमशेरा' चा ट्रेलर 24 जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर एका नचनियाच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याच्यावर डाकू शमशेराचे हृदय येते. करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित 'शमशेरा'ची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहे. हा एक पीरियड ड्रामा अॅक्शन फिल्म असेल. या चित्रपटात रणबीर कपूरची दुहेरी भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी वाणी कपूरने कथ्थकचे प्रोफेशन ट्रेनिंग घेतले आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगू या दोन भाषांमध्येही रिलीज होणार आहे.

कोरोनामुळे (Corona) या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला आणि आता अखेर 22 जुलै रोजी 'शमशेरा' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'संजू'नंतर रणबीर कपूर दीर्घ विश्रांतीनंतर 'शमशेरा' चित्रपटात दिसणार आहे. वाणी कपूर, रणबीर कपूर, संजय दत्त व्यतिरिक्त या चित्रपटात आशुतोष राणा, सौरभ शुक्ला, रोनित रॉय आणि त्रिधा चौधरी देखील दिसणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, मग महिलांना सुरक्षा कशी मिळणार? इंडिया अलायन्सच्या नेत्यांचा घणाघात

Goa Today's Live News Update: मी संघाची विचारधारा स्वीकारली आहे - मंत्री विश्वजीत राणे

Goa Cyber Crime: UAE च्या बँकेत नोकरीचे आमिष; चिंबलच्या तरुणीला मुलाखतीत कपडे काढण्यास सांगितले, गुन्हा नोंद

Lok Sabha Election 2024: इंडिया अलायन्स सरकार स्थापन होताच 30 लाख सरकारी नोकऱ्या देणार: एल्टन डिकॉस्‍टा

SCROLL FOR NEXT