Brahmastra OTT Release Dainik Gomantak
मनोरंजन

Brahmastra OTT Release: 'या' दिवशी डिस्नी प्लस हॉटस्टारवर येणार 'ब्रह्मास्त्र'

दिग्दर्शक अयान मुखर्जी, निर्माता करन जोहरने सोशल मीडियातून दिली माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Brahmastra OTT: बॉक्सऑफिसवर चांगली कामगिरी केलेला या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट 'ब्रह्मास्त्र' आता ओटीटीवर येणार आहे. रविवारी या चित्रपटाची ओटीटी रीलीज डेट जाहीर करण्यात आली. दिग्दर्शक अयान मुखर्जी याने ही डेट जाहीर केली.

रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जून यांच्या प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. रविवारी डिस्नी प्लस हॉटस्टानेही त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली.

4 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हीच पोस्ट चित्रपटाचा निर्माता करन जोहरनेही शेअर केली आहे. करनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटेल आहे की, मोठ्या पडद्यापासून ते तुमच्या हृदयापर्यंत आणि तुमच्या स्क्रीनवर या वर्षीचा सर्वात मोठा हिट चित्रपट ब्रम्हास्त्र ओटीटी रीलीजसाठी पुर्णतः सज्ज आहे.

हा चित्रपट तीन भागात येणार असून 'ब्रह्मास्त्र' हा पहिला भाग आहे. आणखी दोन भाग आगामी वर्षांमध्ये येणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील शाहरूख खानच्या कॅमियोची देखील खूप चर्चा झाली होती. शिवाय शाहरूखने साकारलेल्या भूमिकेचा स्पिन ऑफ (स्वतंत्र चित्रपट) यावा अशी मागणी अनेक चाहत्यांनी केली होती.

खरे तर हे वर्ष अनेक बड्या हिंदी चित्रपटांसाठी अत्यंत वाईट ठरले होते. आमिर खानचा 'लाल सिंग चढ्ढा', अक्षयकुमारचा 'पृथ्वीराज' हे चित्रपट बॉक्सऑफिसवर सपशेल आपटले होते. त्यामुळे 'ब्रह्मास्त्र'वरही अपयशाचे सावट होते. तथापि, 'ब्रह्मास्त्र'ने देशभरात 250 कोटी रूपये तर जगभरातून 400 कोटी रूपयांहून अधिक कमाई केली आहे. 'ब्रह्मास्त्र' शिवाय 'द काश्मीर फाइल्स' आणि 'भूल भुलैया 2' हे देखील यावर्षीचे सुपरहिट चित्रपट आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT