Vidyut Jammwal: अभिनेता विद्युत जामवाल याने भलेही कमी चित्रपट केलेले असोत, पण अॅक्शनपट आवडणाऱ्यांना विद्युतच्या चित्रपटांनी कधी निराश केले नाही. विद्युतच्या अॅक्शन अवताराची दखल हॉलीवुडने देखील घेतली असून आता चक्क हॉलीवूडमध्ये विद्युतच्या एका चित्रपटाचा रीमेक केला जाणार आहे.
विद्युतच्या या चित्रपटाचे नाव आहे 'सनक'. हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर 15 अक्टूबर 2021 रोजी स्ट्रीम झाला होता. हॉलीवुडच्या एका निर्मात्याने या चित्रपटाचा रीमेक बनविण्यासाठी या चित्रपटाचे निर्माता विपुल अमृतलाल शाह यांच्याशी संपर्क साधला आहे. कायलन टायंग असे या हॉलीवूड निर्मात्याचे नाव आहे. टायंग यांनी यापुर्वी 'लॉस्ट अँड फाउंड', 'गिगलबट' अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक कनिष्क वर्मा यांना मेलवरून ही विचारणा केली गेल्याचे विपुल शाह यांनी सांगितले. तो मेल वर्मा यांनी विपुल शाह यांना पाठवला आहे. शाह म्हणाले की, आमच्यासाठी हा चांगला योगायोग आहे. माझा पहिला चित्रपट 'आँखे'साठीही मला हॉलीवुडकडून विचारणा झाली होती. पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही.
मी एकमेव असा व्यक्ती आहे, ज्याच्या दोन चित्रपटांना हॉलीवुडकडून रीमेकसाठी विचारणा झाली आहे. मला वाटते हे खूप आनंददायी आहे. 'सनक'च्या संपुर्ण टीमसाठी ही सन्मानाची बाब आहे. या चित्रपटाला ओटीटीवर संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.
दरम्यान, विद्युतची स्वतःची अशी वेगळी फॅन फॉलोविंग आहे. या फॅन्ससाठी ही गोष्ट अत्यंत आनंददायी आहे. तो स्वतः मार्शल आर्ट शिकलेला असल्याने अवघडात अवघड स्टंट आणि वेगवान फायटिंगची दृश्ये तो सहज करत असतो. त्यामुळे त्याचे अॅक्शनपटांचा वेगळा असा प्रेक्षकवर्ग आहे. विद्युतने केरळच्या कलरीपयट्टु या मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतलेले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.