Ranbir Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Ranbir Kapoor: 'रामायण' साठी रणबीरचा त्याग; शूटिंग पूर्ण होईपर्यंत...

Ranbir Kapoor: तो साकारत असलेल्या पात्राला न्याय देण्यासाठी तो हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमन्तक

Ranbir Kapoor: बॉलीवूडचे कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी त्यांच्या वक्तव्यामुळे, कधी त्यांच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे, कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चांचे कारण बनतात.

बॉलीवूडचा अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून महादेव बेटिंग अॅपमुळे चर्चेत होता. आता मात्र तो त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो लवकरच रामायण मध्ये दिसणार आहे. याच चित्रपटामुळे रणबीर कपूरने मोठा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, रणबीरने व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्याने आपल्या दैनंदीनीमध्ये अनेक बदलही करत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होईपर्यंत तो दारू आणि मांसाला हात न लावण्याचा रणबीरने निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार 'रामायण चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना रणबीर दारू पिणे आणि मांसाहार करणे पूर्णपणे टाळेल. केवळ दिसण्यासाठी नव्हे तर तो साकारत असलेल्या पात्राला न्याय देण्यासाठी तो हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले जात आहे.

'रामायण'चे शूटिंग कधी सुरू होणार?

हा चित्रपट ऑगस्ट २०२४ पर्यंत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्याची शक्यता आहे. ती तीन भागात बनवली जाणार आहे. जिथे कथेचा फोकस राम आणि सीतेवर असेल आणि सीतेचे अपहरण दाखवले जाईल. चित्रपटाच्या व्हीएफएक्ससाठी ऑस्कर विजेत्या कंपनी( Company ) डीएनईजीशी संपर्क साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

रणबीर कपूरचा आगामी चित्रपट 'अॅनिमल'

रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल' या त्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये तो अनिल कपूर, रश्मिका मंदाना ते बॉबी देओल यांसारख्या स्टार्ससोबत दिसणार आहे. हा चित्रपट( Movie ) 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, रामायणावर आधारित प्रभासचा आदिपुरुष चांगलाच वादात अडकला होता. कथेची तोडमोड केल्याचे म्हटले जात होते. त्याचबरोबर, व्हीएफएक्स आणि संवाद यामुळेदेखील चित्रपटाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. आता रणबीरचा रामायण चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT