Rana Daggubati Dainik Gomantak
मनोरंजन

Rana Daggubati : राणा दग्गुबत्ती आता दिसणार एका ऐतिहासिक भूमीकेत...

पोन्नियन सेल्वननंतर आता अजुन एक ऐतिहासिक कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, यात राणा दग्गुबत्ती मुख्य भुमीकेत दिसणार आहे.

Rahul sadolikar

सिनेविश्वातील 'भल्लालदेव' आणि OTT चे 'राणा नायडू' अर्थात राणा दग्गुबत्तीने सॅन डिएगो येथे सुरू असलेल्या कॉमिक-कॉन महोत्सवात चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. राणा दग्गुबती आता 'हिरण्यकश्यप'च्या रुपात पडद्यावर येणार आहे. होय, दिग्दर्शक तेजासह त्याच्या नवीन प्रकल्पाची घोषणा केल्यानंतर, त्याने कॉमिक-कॉनमध्ये तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. 

राणाचं होम प्रोडक्शन

राणाचा हा चित्रपट त्याच्याच प्रोडक्शन हाऊस 'स्पिरिट मीडिया'च्या बॅनरखाली बनत आहे. यासोबतच त्याने मिनल मुरली कॉमिक सुपरहिरोची घोषणाही केली आहे. तो OTT प्लॅटफॉर्म 'सोनी लिव्ह' सोबत 'लॉर्ड्स ऑफ डेक्कन' या ऐतिहासिक वेब सिरीजची निर्मिती करणार आहे.

हिरण्यकश्यप

राणा दग्गुबतीचा 'हिरण्यकश्यप' हा चित्रपट अमर चित्र कथा कॉमिक्सपासून प्रेरित आहे. त्याची कथा स्टार दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांनी लिहिली आहे. राणाला पडद्यावर राक्षस राजाची भूमिका साकारताना पाहणे हा प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव असेल. विशेषत: 'बाहुबली' फ्रँचायझीनंतर अशा भूमिकेतून त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, राणा डग्गुबतीच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.

बरीच वर्षे या प्रोजेक्टवर काम

दिग्दर्शक गुणशेखर यांनी त्यांच्या टीमसोबत काही वर्षे या प्रकल्पावर काम केले आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. गुणशेखर यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची इच्छा राणाने यापूर्वीच व्यक्त केली आहे. गुणशेखर यांचा हा प्रकल्प प्री-प्रॉडक्शन टप्प्यात असताना काही कारणांमुळे तो रखडला. मात्र आता या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे दिसत आहे.

अनिरुद्ध कनिसेट्टी यांच्या बेस्ट सेलर पुस्तकावर आधारित

दुसरीकडे, 'लॉर्ड्स ऑफ द डेक्कन' मालिका अनिरुद्ध कनिसेट्टीच्या बेस्टसेलर 'लॉर्ड्स ऑफ द डेक्कन: फ्रॉम सदर्न इंडिया फ्रॉम साउथर्न इंडिया फ्रॉम चालुक्य टू चोल'पासून प्रेरित असेल. या मालिकेत चालुक्य वंशाच्या जन्माची कथा दाखवली जाणार आहे. शतकानुशतके दक्षिण भारताला आकार देणारे राजवंश अशीच इतिहासात चालुक्य राजवंशाची ओळख आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT