Ramesh Babu, brother of South films superstar Mahesh Babu passed away Dainik Gomantak
मनोरंजन

साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे भाऊ रमेश बाबू यांचे निधन

महेश बाबूच्या कुटुंबाकडून आणखी एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

नुकतीच बातमी आली होती की, साऊथ चित्रपटातील प्रसिद्ध स्टार अभिनेता महेश बाबू कोरोनाच्या विळख्यात आला आहे. त्यानंतर त्याने स्वत:ला कुटुंबीयांपासून वेगळे केले. तो होम आयसोलेशनमध्ये राहत होता. पण आता त्याच्या कुटुंबाकडून आणखी एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे. महेश बाबू (Mahesh Babu) यांचे भाऊ आणि अभिनेते घटामनेनी रमेश बाबू (Ramesh Babu) यांचे निधन झाले आहे. 8 जानेवारी (शनिवार) रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय अवघे 56 वर्षे होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते बऱ्याच काळापासून यकृताशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताला दुजोरा देताना, चित्रपट निर्माते बीए राजू यांनी ट्विट केले की, "आमचे स्वतःचे लाडके रमेश बाबू गरू यांचे निधन झाले. तो सदैव आपल्या हृदयात जिवंत राहील. आम्ही आमच्या सर्व हितचिंतकांना विनंती करतो की त्यांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे आणि स्मशानभूमीत जमणे टाळावे - घट्टामनेनी कुटुंब.”

रमेश बाबू यांच्या आकस्मिक निधनावर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आणि कृष्णाचा मोठा मुलगा रमेश बाबू यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाबद्दल जाणून घेत दिग्दर्शक रमेश वर्मा यांनी ट्विट केले की, "हे जाणून धक्का बसला, रमेश बाबू गरू आता या जगात नाहीत. कृष्णा गुरू, महेश बाबू गुरू आणि संपूर्ण कुटुंबाला माझ्या संवेदना. ओम शांती." महेश बाबूची अलीकडेच कोरोनाव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि ते आजकाल होम आयसोलेशनमध्ये आहेत हे काही लोकांना माहिती नाही.

1974 मध्ये चित्रपट प्रवास सुरू केला

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, रमेश बाबू यांनी 1974 मध्ये 'अल्लुरी सीताराम राजू' या चित्रपटाद्वारे ऑन-स्क्रीन फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. 1997 मध्ये अभिनयातून निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी 15 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. पुढे ते निर्माता झाले. त्यांनी महेश बाबूची मुख्य भूमिका असलेले "अर्जुन" आणि "अतिथी" या चित्रपटांची निर्मिती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

Goa Drug Bust: कोलवाळ जेलजवळ गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 'इतक्या' लाखांच्या गांजासह राजस्थानच्या 19 वर्षीय तरुणाला अटक

Orry in Goa: चक्क बनियानवर 'ऑरी' गोव्यात! सोशल मीडियावर Video Viral; म्हणाला, 'माय काईंड ऑफ गोवा डे'

Goa Live News: पंतप्रधान मोदी काणकोण दौऱ्यावर! भव्य स्वागतासाठी गोवा सज्ज: मंत्री रमेश तवडकर

SCROLL FOR NEXT