Ramayana Trailer Fans Reaction Dainik Gomantak
मनोरंजन

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Ramayana Trailer Fans Reaction: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Sameer Amunekar

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. ट्रेलर समोर आल्यानंतर काहींनी त्याला 'ब्लॉकबस्टर'ची उपाधी दिली, तर काहींनी अपेक्षांच्या तुलनेत तो कमी प्रभावी वाटल्याची प्रतिक्रिया दिली.

ट्रेलरमध्ये राम-रावण संघर्षाची झलक

ट्रेलरची सुरुवात रावणाच्या सामर्थ्यशाली अवताराने होते. त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूरची शांत, संयमी आणि तेजस्वी झलक पाहायला मिळते. लक्ष्मणासोबत राक्षसांविरुद्ध लढणारा राम, सीतेशी विवाह आणि वनवासाचा प्रवास अशा अनेक महत्त्वाच्या प्रसंगांची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. साई पल्लवीची सीतेच्या भूमिकेतील सोज्वळ उपस्थितीही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

रणबीरचा साधेपणा, यशचा रौद्र अवतार ठरला चर्चेचा विषय

ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर रणबीर कपूरच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. प्रभू रामाच्या भूमिकेसाठी त्याने साकारलेला साधा आणि संयमी लूक अनेकांना भावला. दुसरीकडे, रावणाच्या भूमिकेत यशचा दमदार आणि प्रभावी अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनेकांनी या दोन्ही कलाकारांच्या स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक करत चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली.

VFX, संगीत आणि स्टारकास्टची प्रशंसा

चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), पार्श्वसंगीत (BGM) आणि भव्य सेट्स यांचेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. जटायू, ऐरावत आणि युद्धदृश्ये वास्तवदर्शी वाटत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. काही प्रेक्षकांच्या मते, चित्रपटाची भव्यता ट्रेलरमधून स्पष्टपणे जाणवते आणि कलाकारांची निवडही योग्य ठरली आहे.

काही चाहते मात्र निराश

ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये एका गोष्टीची विशेष चर्चा रंगली. रामायणातील अत्यंत महत्त्वाचे पात्र असलेल्या हनुमानाचे दर्शन ट्रेलरमध्ये न झाल्याने अनेकांनी निर्मात्यांना प्रश्न विचारले.

विशेष म्हणजे, हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल झळकणार असल्याची घोषणा यापूर्वीच झाली होती. त्यामुळे त्यांच्या दमदार लूकची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. मात्र ट्रेलरमध्ये त्यांची झलकही न दिसल्याने काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत, हनुमानाच्या पहिल्या दर्शनासाठी आता पुढील टीझर किंवा चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.

चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली

संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्या तरी 'रामायण' हा चित्रपट सध्या वर्षातील सर्वाधिक चर्चेतील चित्रपटांपैकी एक ठरला आहे. ट्रेलरनंतर कलाकारांचा अभिनय, कथा मांडणी, VFX आणि दिग्दर्शन याबाबत उत्सुकता अधिक वाढली असून, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा अंतिम प्रतिसाद कसा असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT