Ramgopal Varma On Kerala Story Dainik Gomantak
मनोरंजन

Ram Gopal Varma On Kerala Story: "हा तर बॉलिवूडचा मेलेला चेहरा !" केरळ स्टोरीवर प्रसिद्ध दिग्दर्शकाचं मत

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केरळ स्टोरीवर चित्रपटांचा मृत चेहरा अशी टिप्पणी केली आहे.

Rahul sadolikar

Ram Gopal Varma On Kerala Story: द केरळ स्टोरीची चर्चा सध्या मनोरंजन क्षेत्रापासुन राजकिय क्षेत्रापर्यंत सुरू आहे. 'द केरळ स्टोरी' सतत चर्चेत आहे. हा चित्रपट 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, मात्र यासंबंधीचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

आताही लोक या चित्रपटाबद्दल आपली मते मांडत आहेत. काही समर्थन करत आहेत तर काही विरोध करत आहेत. 

आता बॉलिवूड चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या चित्रपटाचे समर्थन करत बॉलीवूडवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, हा 'चित्रपट एक सुंदर भुताटकीचा आरसा आहे जो मुख्य प्रवाहातील बॉलिवूडचा मृत चेहरा दाखवतो.'

द केरळ स्टोरीचं कौतुक

राम गोपाल वर्मा हे त्यांच्या धारदार ट्विटसाठी आणि जवळपास प्रत्येक मुद्द्यावर त्यांच्या मतासाठी ओळखले जातात. त्यांनी 'रंगीला', 'सत्या', 'शूल', 'कंपनी' असे अनेक हिट सिनेमे केले आहेत. 

अनेक अभिनेत्यांना असेही वाटते की त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीची अनेक प्रकारे व्याख्या बदलली आहे. आत्तापर्यंत, त्यांनी चित्रपट दिग्दर्शित करुन बनवून बराच काळ लोटला आहे, परंतु अलीकडे ते मुख्य प्रवाहातील बॉलीवूडवर टीका करताना आणि 'द केरळ स्टोरी' चं कौतुक करताना दिसले.

राम गोपाल वर्मा यांचे ट्विट

राम गोपाल वर्मा यांनी अनेक ट्विट केले आहेत. ते नाव न घेता इंडस्ट्रीतल्या एका वर्गाविरोधात बोलले आहेत.

त्यांनी पहिले ट्विट केले की, 'आम्ही स्वतःशी आणि इतरांशी खोटे बोलण्यात इतके सोयीस्कर आहोत की जेव्हा कोणी पुढे जाऊन सत्य उघड करते तेव्हा आम्हाला धक्का बसतो. #KeralaStory च्या घवघवीत यशावर बॉलीवूडचं शांत बसणं हे मृत्यूचे स्पष्टीकरण देते.'

"हा तर बॉलिवूडचा आरसा !"

राम गोपाल वर्मा पुढे म्हणाले की, हा बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहाचा आरसा आहेम, "#KeralaStory ही एक सुंदर भुताच्या आरशासारखी आहे, जी मुख्य प्रवाहातील बॉलीवूडचा मृत चेहरा त्याच्या सर्व कुरूपतेसह दाखवतो." येत्या काही वर्षांत हा चित्रपट अनेकांना त्रास देईल, ते पुढे म्हणाले, "#KeralaStory बॉलीवूडमधील प्रत्येक कथा डिस्कशन हॉल आणि कॉर्पोरेट हाऊसमध्ये एका रहस्यमय धुक्याप्रमाणे कायम राहील.

" चित्रपट ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे इंडस्ट्रीला त्यातून काहीही शिकायचे नाही, कारण खोट्याची कॉपी करणे सोपे असते, पण सत्याची कॉपी करणे खूप अवघड असते, असेही ते म्हणाले.

सुदिप्तो सेन यांचे दिग्दर्शन

केरळ स्टोरी चे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. यात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बालानी आणि देवदर्शनी यांनी दमदार अभिनय केला आहे.

शबाना आझमी, कंगना राणौतसह अनेक स्टार्सनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT