Ram Charan Dainik Gomantak
मनोरंजन

Ram Charan : अभिनेता रामचरणच्या बायकोचा बदला.. नवऱ्याला दिली अशी शिक्षा, व्हिडीओ बघाच

अभिनेता रामचरणच्या एका चुकीवर त्याच्या बायकोने अशी शिक्षा दिली की तो पुन्हा कधीच असं करणार नाही

Rahul sadolikar

असं म्हणतात की सामान्य माणूस असो वा देशाचा पंतप्रधान असो की सुपरस्टार, बायकोसमोर कुणाचंच चालत नाही. घराबाहेर तुम्ही भलेही राजा असाल पण घरात तुमचं काहीही चालत नाही आणि ही गोष्ट दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणच्या व्हायरल व्हिडिओवर अगदी तंतोतंत खरी ठरते.

 ब्लॉकबस्टर चित्रपट 'RRR' अभिनेता राम चरण चित्रपटांमध्ये सिंहासारखा गर्जना करताना आणि शत्रूंची दानादान उडवताना दिसतो; पण त्याने खऱ्या आयुष्यात केलेल्या एका चूकीमुळे त्याला पत्नी उपासनाच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. खरं तर, राम चरणची एक चूक नंतर त्याला महागात पडला. चला पाहुया नक्की काय झालं होतं

 राम चरण आणि उपासना यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उपासना राम चरणचा बदला घेताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राम चरण घरातील सगळी कामं करताना दिसत आहे.

 वास्तविक, इन्स्टाग्रामवर एका फॅन पेजने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राम चरण उपासनाला त्रास देत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की राम चरण उपासनाला त्याच्यापासून दुसऱ्या सीटवर जाण्यास सांगतो, त्यानंतर ती शांतपणे तिथून निघून जाते. पण दुसर्‍या दिवशी असे काही घडते, जे तुम्हाला नक्कीच हसायला लावेल

दुसर्‍या दिवशी उपासना घराच्या सोफ्यावर बसून रामाच्या पायांना ऑर्डर देत आहे. राम चरण घर साफ करण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत दिसतो. हा व्हिडिओ शेअर करत फॅन पेजने लिहिले की, 'उपासना चा बदला...' चाहते या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. 

व्हिडिओवर येणाऱ्या लोकांच्या मजेशीर कमेंट्स वाचून प्रत्येकजण खूप हसत आहे. चाहते या व्हिडिओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत. व्हिडिओवर येणाऱ्या लोकांच्या मजेशीर कमेंट्स वाचून प्रत्येकजण खूप हसत आहे. चाहते या व्हिडिओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT