Rakhi Sawant  Dainik Gomantak
मनोरंजन

Rakhi Sawant : "तुला लाज वाटली पाहिजे, माझा नवरा चोरलास!" राखीने नवऱ्याचीही अब्रू काढली

ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाली असुन आता तिने नवरा आदिलच्या गर्लफ्रेंडचे नाव सांगितले आहे

Rahul sadolikar

Rakhi Sawant new drama : राखी सावंत आणि ड्रामा या दोन शब्दांना एकमेकांपासुन वेगळे करणं मुश्कील आहे. राखी सावंतने गेल्या काही काळापासून पती आदिल खान दुर्रानी यांची बदनामी करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. हे प्रकरण आता त्यांच्या घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. हे घडणार की नाही हे माहीत नसले तरी ही राखी दररोज मीडियामध्ये अनेक गोष्टी सांगत असते. 

आता तिने आदिलच्या कथित गर्लफ्रेंडबद्दलही सांगितले आहे की ती कोण आहे आणि तिचे नाव काय आहे. यानंतर आता राखीचा भाऊ वेगळेच वक्तव्य करत आहे. आईच्या निधनानंतर राखी थोडी अस्वस्थ आहे, त्यामुळे ती काहीही बोलत असल्याचे तो सांगतो.

राखी सावंतच्या पहिल्या लग्नाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. आता तिच्या दुसऱ्या लग्नाबाबतही तेच होताना दिसत आहे. ती दररोज मीडियाला बोलावून नवीनवी माहिती देत असते आणि आधी आदिलला फोडते आणि नंतर म्हणते की आता सर्व काही ठीक आहे  

या सगळ्यामध्ये राखीच्या भावाने महत्त्वाचे विधान केलं आहे. राकेश सावंत म्हणाला राखी थोडी अस्वस्थ झाली आहे, म्हणूनच ती जे काही बोलत आहे ते बोलत आहे, ती शुद्धीत नाहीये.

 मी लोकांना एवढंच सांगेन की मी हात जोडून विनंती करतो की, त्यांच्या बोलण्यावर मन नको. त्याच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावू नका. मी चाहत्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी त्याची काळजी घ्यावी. आज तिला तुमच्या प्रेमाची गरज आहे. समर्थन आवश्यक आहे.

एकीकडे भाऊ राकेश बहीण राखीसाठी हात जोडून चाहत्यांना विनंती करत आहे. तर राखी सावंत तिच्याच बोलण्यात मग्न आहे. आदिलच्या गर्लफ्रेंडचे नाव आधी सांगू नका असे तिने पापाराझीसमोर सांगितले होते.

 पण आता राखीने स्वत:च त्याची सर्व गुपिते उघड केली आहेत. राखीच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. काही दिवस हॉस्पीटलमध्ये राहुन शेवटी तिच्या आईने अखेरचा श्वास घेतला. या घटनेला काही दिवसच लोटले आणि राखीचा ड्रामा पुन्हा सुरू झाला आहे.

राखी सावंत म्हणाली- तिचे नाव तनू आहे. आदिलला लाज वाटली पाहिजे.आदिल या मुलीसोबत राहत आहे. आधी त्याने परत येईन असे सांगून जबरदस्तीने माझी माफी मागितली पण तो आला नाही. त्या मुलीला लाज वाटली पाहिजे की ती कोणाचा तरी नवरा चोरते. माझे नाणे खोटे आहे. मी काही बोलू शकत नाही. माझ्या नवऱ्याला किती दिवस वाचवणार? यात खरं काही माहीत नाही ;पण राखी आपल्या त्याच जुन्या अवतारात प्रकट झाली आहे हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT