Joyland: पाकिस्तानच्या पहिल्या ऑस्कर एंट्री 'जॉयलॅंड' वरील हटवले बॅन, 'या' शुक्रवारी होऊ शकतो रिलीज

Joyland: पाकिस्तानचा हा वादग्रस्त चित्रपट शुक्रवारी रिलीज होण्याची शक्यता आहे.
Joyland
JoylandDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांनी चित्रपट निर्माता सैम सादिक यांच्या 'जॉयलँड' (Joyland) चित्रपटावरील बंदी उठवली आहे. त्यानंतर हा चित्रपट शुक्रवारी रिलीज होऊ शकतो. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर 4 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला होता, परंतु रिलीजपूर्वीच पाकिस्तानने चित्रपटावर बॅन आणला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटात 'अतिशय आक्षेपार्ह मजकूर' असल्याचे सांगत त्यावर बंदी घातली होती.

  • 'जॉयलँड' च्या कंटेंटबाबत विरोध

'जॉयलँड' चित्रपटातील कंटेंटबाबत पाकिस्तानमध्ये जोरदार विरोध झाला होता. त्यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतला होता. मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून म्हटले होते, "चित्रपटात अत्यंत आक्षेपार्ह मजकूर असल्याच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, जो आपल्या समाजातील मूल्ये आणि मानकांशी सुसंगत नाही."

  • जॉयलँड ही पाकिस्तानची पहिली ऑस्कर एन्ट्री

जॉयलँड हा ऑस्करसाठी (Oscar) पाठवलेला पहिला पाकिस्तानी (Pakistan) चित्रपट ठरला आहे. ऑस्करपूर्वी 'जॉयलँड' कान फिल्म फेस्टिव्हलसह इतर अनेक परदेशी चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे.

Joyland
Saif Ali Khan Divorce: सैफ आणि अमृता 18 वर्षापूर्वी झाले होते वेगळे, अमृताला दिले होते एवढे पैसे
  • जॉयलँड ची कथा

जॉयलँड हा सैम सादिक यांनी दिग्दर्शीत केला आहे. हा चित्रपट (Movie) 18 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानातील थिएटरमध्ये रिलीज होणार होता. हा चित्रपट एका पितृसत्ताक कुटुंबाभोवती फिरतो ज्याला आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी मूल हवे असते. जेव्हा कुटुंबातील सर्वात लहान मुलगा, नायक, गुप्तपणे डान्स थिएटरमध्ये सामील होतो आणि एका ट्रान्स स्त्रीच्या प्रेमात पडतो तेव्हा गोष्टींना एक मनोरंजक वळण मिळते. जॉयलँडमध्ये सानिया सईद, अली जुनेजो, अलीना खान, सरवत गिलानी, रस्टी फारुक, सलमान पीरजादा आणि सोहेल समीर या मुख्य भूमिकेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com