Rakhi Sawant  Dainik Gomantak
मनोरंजन

Rakhi Sawant: '... तर मी पण टकली होईन' असं का म्हणाली राखी सावंत?

दैनिक गोमन्तक

Rakhi Sawant: राखी सावंत अनेकदा आपल्या पब्लिक प्लेसेसमध्ये केलेल्या कृतींमुळे चर्चेत असते. कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असणारी राखी आता शाहरुख खानवर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

शाहरुख खानचा जवान या चित्रपटाचा प्रिव्ह्यू नुकताच रिलिज झाला आहे. हा प्रिव्ह्यू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून चाहते आता चित्रपट रिलिज होण्याची वाट पाहत आहेत. आता राखी सावंतला पापराझींनी शाहरुखच्या नव्या अवताराबद्दल विचारल्यावर आपल्या नेहमीच्या हटके स्टाइलमध्ये राखीने उत्तर दिले आहे.

सुरुवातीला म्हणते, शाहरुखचे केस कुठे गेले? त्यानंतर तुम्ही जवानचा प्रिव्ह्यू पाहिला का असे विचारल्यावर ती म्हणते शाहरुख खूप हॅंडसम आहे, त्याला टकले पाहिल्यावर माझे डोळे फूटून जातील. शेवटी ती म्हणते जर शाहरुख टकला झाला असेल तर मीसुद्धा टकली होईन. आता राखीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी विविध कमेंट कदरम्यान, जवानच्या प्रिव्ह्यूवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या जवानाच्या पोस्टर्समध्ये शाहरुख खान डोक्यावर आणि चेहऱ्यावर पट्टी बांधलेला दिसत आहे. पण त्याचे रहस्य 'जवान'च्या प्रिव्ह्यूमध्ये उलगडले, ज्याने खळबळ उडवून दिली आहे. 

शाहरुख अतिशय धोकादायक भूमिकेत असून त्याचा लूक पूर्णपणे टक्कल आहे. म्हणजे त्याला टक्कल पडले आहे. 'जवान'मध्ये शाहरुख पुन्हा एकदा दहशत निर्माण करणार आहे. 'जवान'चा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर चाहते ट्विटरवर प्रतिक्रिया देत आहेत.

या चित्रपटात भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे, त्याची झलक पाहून चाहत्यांनी अप्रतिम प्रतिक्रिया दिल्या आहेत. आजपर्यंत पाहिलेला हा सर्वोत्तम टीझर असून हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचे चाहते सांगत आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT