Raju Srivastava  Dainik Gomantak
मनोरंजन

Raju Srivastava Health: श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, आज 15 दिवसांनी आले शुद्धीवर

Raju Srivastava Latest News: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल कॉमेडियन राजू श्रीवास्तव 15 दिवसांपासून जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांचे कुटुंबीय आणि चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असुन आज राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर आज 15 दिवसांनी ते शुद्धीवर आले आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे
राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या पर्सनल सेक्रेटरींनी माहिती दिली आहे की, "राजु यांना आज शुद्धी आली आहे आणि दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांकडून त्यांची देखरेख केली जात आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे.” 10 ऑगस्ट रोजी त्यांना जिममध्ये वर्कआउट करताना छातीत दुखू लागल्याने ते खाली कोसळले नंतर त्यांना येथे दाखल करण्यात आले होते.

मित्रानेही पोस्ट केली राजू श्रीवास्तव शुद्धीवर आल्याची माहिती
राजू श्रीवास्तवचा मित्र अन्नू अवस्थी याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर व्हिडिओ (Video) पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, राजू भैय्या शुद्धीवर आला, तुमच्या प्रार्थना कामी आल्या. त्याने असेही सांगितले की, राजू श्रीवास्तव यांच्याशी बोलणे झाले.

राजू श्रीवास्तव यांना आता न्यूरोलॉजी थेरपी दिली जात आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत शेवटच्या दिवशी जारी केलेल्या अपडेटमध्ये त्यांचा मेंदू वगळता संपूर्ण शरीर काम करत असल्याचे सांगण्यात आले. मेंदूचा संसर्गही दूर झाला आहे. राजू श्रीवास्तव यांनाही न्यूरो फिजिओथेरपी दिली जात आहे. सध्या त्यांच्यावर एम्सच्या न्यूरोलॉजीच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी! स्टार खेळाडूनं निवृत्ती मागे घेतली, T-20 आणि कसोटीतही खेळणार

'या दुःखद घटनेने मन हेलावले', हडफडे नाईटक्लब प्रकरणानंतर मालकाची पहिली प्रतिक्रिया; कोण आहे हा सौरभ लुथरा?

Goa Bus Stand: गुड न्यूज! गोव्यातील 'ही' बसस्थानके होणार चकाचक; जवळपास 400 कोटी खर्चून मिळणार अद्ययावत सुविधा

Serendipity Festival 2025: सेरेंडिपीटीत अवतरणार महाकाय नरकासुर! 5 वेगवेगळ्या ठिकाणी मिळणार पाहायला; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

एकाच घरातील तिघी बहिणी, भाऊ आणि बॅचलर पार्टीसाठी आलेला 'इशाक'; हडफडे क्लब आगीमुळे एका क्षणात अनेक कुटुंबांवर शोककळा

SCROLL FOR NEXT