Dhanush, Rajinikanth  Dainik Gomantak
मनोरंजन

Dhanush ऐश्वर्याचं लग्न वाचवण्यासाठी Rajinikanth यांचा पुढाकार, दोघांच नातं पूर्ववत होणार का?

दोघांमधील मतभेद दूर व्हावे यासाठी खुद्द रजनीकांत परिश्रम घेत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

साऊथचा सुपरस्टार धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांनी घटस्फोट घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काही दिवस उलटल्यानंतर दोघेजण पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण, पती-पत्नीने या संबधित प्रसारित होणाऱ्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. धनुष आणि ऐश्वर्या यांचे नाते पूर्ववत होण्यासाठी आता खुद्द रजनीकांत यांनी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे.

धनुष आणि ऐश्वर्या यांना एकत्र आणण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत प्रयत्नशील आहेत. रजनीकांत दोघांच्या कुटुंबीयांना समजवण्यासाठी सध्या धडपडत आहेत. रजनीकांत धनुषचे सासरे असल्याने दोघांचे नाते टिकावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच रजनीकांत यांनी धनुष आणि ऐश्वर्या यांची दोनवेळा भेट घेतली. दोघांमधील मतभेद दूर व्हावे यासाठी खुद्द रजनीकांत परिश्रम घेत आहेत.

धनुष आणि ऐश्वर्याने या वर्षाच्या सुरुवातीला सोशल मीडियावर द्वारे वेगळे होण्याची घोषणा केली. तसेच, दोघांनी त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली. 'आमचा 18 वर्षांचा प्रवास समजूतदारपणाचा होता. पण, आज आमचे मार्ग वेगळे आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा.' असे धनुषने आपल्या सोशल मिडियावर लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hadkolan Goa: रेड्यांच्या जत्रेसाठी सुप्रसिद्ध असलेले, निसर्ग सौंदर्याने सजलेलले गाव 'अडकोळण'

Iran America Tension: "ट्रम्प इराणचे गुन्हेगार...!", खामेनेई यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षावर ठेवला विध्वंसाचा ठपका; जागतिक राजकारणात पुन्हा खळबळ

Goa Crime: आधी प्रेम, मग अनन्वित अत्याचार अन् शेवटी गळा चिरला, रशियन सिरीयल किलरच्या क्रूरतेनं हादरला गोवा; लवकरच उलघडणार 10 तरुणींच्या मृत्यूचं गूढ?

Congress MLA: "सुंदर मुलगी दिसली की मन भटकतं अन् अत्याचर होतो..." काँग्रेस आमदारानं तोडले अकलेचे तारे; घृणास्पद वक्तव्यावर भाजप आक्रमक VIDEO

अँड्रॉइड स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटा! डॉल्बी ऑडिओमधील तांत्रिक बिघाडानं उडाली खळबळ; केंद्र सरकारकडून नवीन चेतावणी जारी

SCROLL FOR NEXT