Rakhi Sawant: साजिद खानच्या मदतीला धावली राखी सावंत

साजिदवरती लैंगिक शोषण केल्याचे आरोप केल्यानंतर तो बराच काळ सिनेसृष्टीतून गायब झाला होता.
Sajid Raki
Sajid Raki Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडमधील दिग्दर्शक साजिद खान बिग बॉसमध्ये (Bigg Boss) सहभागी झाला आहे. त्याच्या शो मधील सहभागावरून सतत वाद होत आहेत. दीया और बाती मालिकेतील अभिनेत्री कनिष्का सोनीने साजिदवरती लैगिंक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे साजिद खान (Sajid Khan) विरोधी वातावरण तयार झाले असताना बोल्ड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) साजिदच्या मदतीला धावली असून, तिने सर्वांना एक आवाहन केले आहे.

Sajid Raki
Code Name Tiranga Review : परिणीती चोप्राची दमदार अॅक्शन अवतारात एंट्री; काय आहे 'कोड नेम तिरंगा'ची कहाणी?

साजिदवरती लैंगिक शोषण केल्याचे आरोप केल्यानंतर तो बराच काळ सिनेसृष्टीतून गायब झाला होता. बिग बॉसमधून साजिद आपली नवी इनिंग सुरू करत आहे. अशात त्याच्या विरोधात वातावरण तयार झाल्याने राखीने साजिदच्या समर्थनात एक संदेश शेअर केला आहे.

'साजिद खान माझा कुणी नाही, पण माणुसकीच्या नात्याने, त्याला पहिल्यांदा जगू द्या. नाहीतर तो आत्महत्या करेल.' असा संदेश राखी सावंतने शेअर केला आहे.

राखी सावंत पुढे म्हणाली, साजिदने शिक्षा भोगली आहे, मागील चार वर्षात त्यांने काहिच काम केले नाही. त्याला जगू द्या. माहित नाही त्याच्यावर करण्यात आलेले आरोप खरे आहेत की खोटे. याचा निर्णय न्यायालय घेईल. असे राखीने म्हटले आहे. साजिद बद्दल भावना व्यक्त करताना राखी सावंतच्या डोळ्यात अश्रु तरळले.

Sajid Raki
Highest IMDB Rated Indian Movie: 'या' भारतीय चित्रपटाला 'आयएमडीबी'वर सर्वाधिक रेटिंग

साजिद खानवर लैंगिक शोषणचे आरोप

साजिद खानवरती जवळपास 9 अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यामध्ये अभिनेत्री कनिष्का सोनी हिचे देखील नाव आहे. साजिदने बिग बॉसमध्ये प्रवेश केल्याने त्याच्यावर अनेक स्तरातून टिका होत आहे. तसेच, अनेकांनी साजिदला नेटवर ट्रोल देखील केले आहे. त्यामुळे आगामी काळात साजिद बिग बॉसच्या घरात राहतो की बाद होऊन बाहेर पडतो हे काही दिवसांत कळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com