Rajanikanth Praises Kantara Dainik Gomantak
मनोरंजन

Rajanikanth Praises Kantara: 'कांतारा' हा मास्टरपीस; चित्रपट पाहून अंगावर काटा आला!

थलैवाकडून सोशल मीडियातून अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीची तोंडभरून स्तुती

गोमन्तक डिजिटल टीम

Rajanikanth Praises Kantara: कन्नड अभिनेता, दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' चित्रपट रीलीज झाल्यापासून तो चर्चेत आहे. अनेक जणांनी चित्रपटाचे कौतूक केले आहे, त्यात आता थलैवा रजनीकांत यांचाही समावेश झाला आहे. रजनीकांत यांनी हा चित्रपट मास्टरपीस असल्याचे म्हटले आहे.

रजनीकांत यांनी सोशल मीडिया पोस्टमधून या चित्रपटाची तोंडभरून स्तुती केली आहे. त्यांनी या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता ऋषभ शेट्टीचे कौतूक केले आहे. त्यांनी या चित्रपटाला मास्टरपीस असे संबोधले आहे.

रजनीकांत यांनी लिहिले आहे की, कांतारा पाहताना माझ्या अंगावर काटा आला. असे चित्रपट केवळ 'होंबले फिल्म्स'च बनवू शकतात. ऋषभ शेट्टी एक लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून तु केलेल्या कामाला माझा सलाम. सोबतच चित्रपटच्या संपुर्ण टीमला शुभेच्छा.

दरम्यान, रजनीकांत यांच्यापुर्वी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा, विवेक अग्निहोत्री, अभिनेता प्रभास, अभिनेत्री कंगना राणावत या सेलिब्रिटींनीही या चित्रपटाचे कौतूक केले आहे. 30 सप्टेंबर रोजी रीलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 211.5 कोटी रूपयांची कमाई केली आहे.

मूळचा कन्नड असलेला हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदी, तेलगु या भाषेतही रीलीज केला गेला. 'कांतारा' आयएमडीबीवर सर्वाधिक रेटिंग मिळवणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला 9.4 रेटिंग मिळाले आहे. चित्रपटात सप्तमी गौडा, किशोर आणि अच्युत कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'केजीएफ २' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे निर्मात्यांनीच या चित्रपटाचीही निर्मिती केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT