Raj Kundra शर्लिन चोप्रा विरोधात ५० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल dainik gomantak
मनोरंजन

राज कुंद्रा प्रकरण 'शर्लिन चोप्राला' पडलं महागात!

शर्लिन चोप्रा विरोधात मानहानीचा खटला दाखल; जाहीर माफी न मागितल्यास ५० कोटी रुपयांचा दावा

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला (Raj Kundra) पोर्नोग्राफी केस प्रकरणात अटक करण्यात आली होती दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली असून, राज कुंद्राला सुमारे २ महिने तुरुंगात दिवस काढावे लागले होते.

काही दिवसांपूर्वीच राज कुंद्रा जेल मधून जमीन मिळवून बाहेर अला आहे, परंतु जेल मधून बाहेर आल्यावर त्याला अनेक गंभीर आरोपांना सामोरे जावे लागले होते. अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी विरोधात शारीरिक आणि लैंगिक छळासंबंधात गुन्हा दाखल केला होता. पण या आरोपांना फटकरून लावत, राज कुंद्रा यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्रा विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला असून, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे वकील प्रशांत पाटील यांनीही अभिनेत्रीला नोटीस बजावून तिला एका आठवड्याच्या आत जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. सदर नोटीसमध्ये म्हटले आहे की, जर अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची माफी मागितली नाही तर तिच्यावर ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला जाईल.

बनावट आरोप

शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून निराधार आणि कोणत्याही पुराव्याशिवाय आहेत. बदनामी करण्याच्या हेतूने हे आरोप करण्यात आले असून हा पैसे उकळण्याचा कट आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा जेएल स्ट्रीम ॲपशी काहीही संबंध नसल्याचे या आधीच स्पष्ट झाल्याने अभिनेत्रीचे नाव जाणून बुजून घेतल्याचे स्पष्ट होते.

शर्लिन चोप्रा विरोधात भारतीय दंड संहिता,1860 च्या कलम 499, 550, 389 आणि 195 (अ) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धक्का लागताच मेट्रोत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, केस ओढत एकमेकींना बदडले; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, 'रिअ‍ॅलिटी शो पेक्षाही डेंजर'

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! गोव्यात विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित; बस चालकांसाठी 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

SCROLL FOR NEXT