Anshul Kamboj Lookalike Police Officer Dainik Gomantak
मनोरंजन

VIDEO: विजयच्या शपथविधी सोहळ्यात चेन्नईच्या खेळाडूची 'पोलीस' बनून एन्ट्री? आर. अश्विनची 'गुगली'; म्हणाला, "टॅक्सी पकड चेपॉकवर पोहोच"

Anshul Kamboj Lookalike Police Officer: रविवारी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून जोसेफ विजय यांनी शपथ घेतली. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सुरू असताना मंचावर उपस्थित असलेल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Sameer Amunekar

रविवारी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून जोसेफ विजय यांनी शपथ घेतली. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सुरू असताना मंचावर उपस्थित असलेल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा अधिकारी हुबेहूब चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) वेगवान गोलंदाज अंशुुल कंबोज याच्यासारखा दिसत होता. योगायोग म्हणजे, याच दिवशी दुपारी ३:३० वाजता चेन्नईचा लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध महत्त्वाचा सामना होता.

आर. अश्विनची 'गुगली' आणि सोशल मीडियावरील कल्ला

अंशुुल कंबोजशी साधर्म्य असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याचा फोटो वाऱ्यासारखा पसरला. भारताचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विनने या संधीचा फायदा घेत कंबोजची फिरकी घेतली. अश्विनने 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले, "कर्तव्य नेहमीच श्रेष्ठ असते, पण आजच्या करो या मरो (CSK vs LSG) सामन्याच्या दिवशी हे जरा जास्तच झाले. अंशुुल, सामना दिवसा आहे, लवकर टॅक्सी पकड आणि चेपॉकवर पोहोच!"

अश्विनच्या या मिश्किल पोस्टनंतर चेन्नई सुपर किंग्सनेही यात उडी घेतली. कंबोज सराव करत असल्याचा व्हिडिओ शेअर करत, "काळजी करू नका, अंशुुल कंबोज इथेच आहे," असे स्पष्टीकरण देत चाहत्यांची करमणूक केली.

३.४० कोटी रुपयांना संघात सामील झालेला हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुुल कंबोज यंदाच्या आयपीएल २०२६ चा शोध मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याने चेन्नईच्या गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. त्याने आतापर्यंत १० सामन्यांत १७ बळी घेतले असून, पॉवरप्लेमध्ये ऋतुराज गायकवाडचा तो सर्वात विश्वासू गोलंदाज ठरला आहे.

या गमतीदार प्रकरणानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे ऋतुराजने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. आता मंचावर 'दिसलेला' कंबोज मैदानात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT