PV Sindhu Said Allu Arjun Insta/PV Sindhu
मनोरंजन

वाढलेल्या वजनामुळे अल्लू अर्जुनला 'वडा पाव' म्हणणाऱ्यांची पीव्ही सिंधूने केली बोलती बंद

फोटोमध्ये अल्लू एकदम स्टाइलिश आणि मस्त दिसत आहे. दुसरीकडे, पीव्ही सिंधूने लेहेंगा घातला आहे.

दैनिक गोमन्तक

PV Sindhu Said Allu Arjun: पुष्पा फेम साऊथ स्टार अल्लू अर्जुन हा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे, जो केवळ दक्षिणेतच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. पुष्पानंतर अल्लू अर्जुनने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. अलीकडेच तो वाढलेल्या वजनामुळे खूप ट्रोल झाला होता. ज्याचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. अल्लू अर्जुनलाही या लूकवरून खूप कमेंट करण्यात आल्या होत्या. लोकांनी त्याला 'वडा पाव' आणि 'मोटू' म्हणत ट्रोल केले. पण आता भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पुष्पा स्टार अल्लू अर्जूनसोबत एक फोटो शेअर केला आहे. तिने अल्लू अर्जुनसाठी पोस्टमध्ये जे काही लिहिले आहे ते पाहून सिंधूने अर्जुनला ट्रोल करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

पीव्ही सिंधूने अल्लू अर्जुनला नवीन नाव दिले आहे. पुष्पा स्टार अल्लू अर्जूनचा एक फोटो शेअर करताना तिने त्याला 'स्टायलिश अॅक्टर' म्हटले आहे. फोटोमध्ये अल्लू एकदम स्टाइलिश आणि मस्त दिसत आहे. दुसरीकडे, पीव्ही सिंधूने लेहेंगा घातला आहे. ती भारतीय लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. दोघेही हसत हसत कॅमेऱ्यासमोर पोज देत आहेत.

खरं तर, अलीकडेच अल्लू अर्जुन आणि पीव्ही सिंधू यांनी हैदराबादमध्ये उद्योगपती निम्मगद्ध प्रसाद यांचा मुलगा निखिलच्या एंगेजमेंटला हजेरी लावली होती. हा फोटो या कार्यक्रमादरम्यानच काढण्यात आला आहे. फोटो शेअर करत सिंधूने लिहिले, 'स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनसोबत.' पीव्ही सिंधू आणि अल्लू अर्जुनचा हा फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे आणि चाहते त्यांच्या पोस्टवर लोक लाइक्सचा वर्षाव करत आहेत. पोस्टवर अनेक लाइक्स आणि कमेंट्सही येत आहे.

कामाबद्दल बोलायचे झाले तर अल्लू अर्जुन त्याच्या आगामी 'पुष्पा: द रुल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानंतर तो AA21 मध्ये दिसणार आहे. अद्याप या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले नाही. दरम्यान अल्लू लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT