Viral Video: आलियाच्या प्रेग्नसीच्या बातमीनंतर ऋषी कपूर यांचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

रणबीरने लवकर लग्न करावं आणि त्याला मुलं व्हावीत, अशी इच्छा ऋषी यांनी या व्हिडिओमध्ये अनेक वर्षांपूर्वी व्यक्त केली होती.
Video Viral| Risi Kapoor | Alia Bhatt |Ranbir kapoor
Video Viral| Risi Kapoor | Alia Bhatt |Ranbir kapoorDainik Gomantak

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत गोड बातमी दिली. तेव्हापासून रणबीर-आलियाचे फॅन स्टार कपलवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. रणबीर आणि आलिया या वर्षी 14 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले. अवघ्या दोन महिन्यांतच त्यांनी ही आनंदाची बातमी दिली. या बातमीने संपूर्ण कपूर कुटुंब आनंदी झालं आहे. या आनंदाच्या क्षणी परंतु कदाचित या सर्वांना रणबीरचे वडील ऋषी कपूर (Rishi Kapoor) आठवत असतील, ज्यांनी खूप पूर्वी आजोबा होण्याची इच्छा व्यक्त केली होती. (rishi kapoor old video viral ranbir kapoor alia bhatt pregnancy news)

कर्करोगाशी झुंज देत असताना 2020 मध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले. तोपर्यंत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांनी लग्न केले नव्हते. मृत्यूपूर्वी ऋषी यांनी एका मुलाखतीत उघडपणे त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली होती.

रणबीरने लवकर लग्न करावे आणि त्याला मुलं व्हावीत. 2018 मध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ऋषी कपुर म्हणाले होते, 'त्याच्यासाठी लग्न करण्याची ही योग्य वेळ आहे. मी 27 वर्षांचा असताना सेटल झालो आणि रणबीर आता 35 वर्षांचा आहे.

त्यामुळे त्याने लग्नाचा विचार करावा. तो त्याला वाटेल त्या मुलीशी लग्न करू शकतो, त्यात आमची काहीच अडचण नाही. मला मरण्यापूर्वी माझ्या नातवंडांसोबत वेळ घालवायचा आहे.'

Video Viral| Risi Kapoor | Alia Bhatt |Ranbir kapoor
Ranbir Kapoor On His Children: लग्नाच्या अगोदरच झालं 'प्लॅनिंग', मुलांच्या नावानं टॅटूही तयार

ऋषी कपूर यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते रणबीरला लग्न करण्याचा आणि लवकर बाबा होण्याचा सल्ला देत आहेत. या व्हिडिओमध्ये ऋषी म्हणाले की, 'तुला कोणाबरोबरही आयुष्य जगायचं आहे ते तू पूर्णपणे जगू शकतोस. पण व्यक्तिची निवड करताना सावधगिरी बाळगली पाहिजे की ती तुझ्या होणाऱ्या बाळाची आई असेल. जो मुलगा राज कपूर यांचा पणतू आणि माझा नातू असेल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com