Where is Pushpa?... Video Viral Dainik Gomantak
मनोरंजन

Where is Pushpa?... Video Viral : कुठे आहे 'पुष्पा'? पुष्पाचा थरारक व्हिडीओ झाला रिलीज

पुष्पा कुठे आहे? हा प्रश्न विचारत एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

Rahul sadolikar

'पुष्पा'च्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्कंठा वाढत असतानाच, प्रॉडक्शन हाऊसने नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे, जे पाहून 'पुष्पा' कुठे आहे? हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक झाले आहेत.

अशातच, ही व्हिडिओ पाहून पुष्पा फ्रँचायझीचा पुढील चित्रपट 'पुष्पा-द रुल'ची अधिकृत घोषणा असल्याचे अंदाज सिनेप्रेमींद्वारा लावले जात आहेत. हा क्रिप्टिक व्हिडिओ सूचित करतो की पुष्पा तिरुपतीमध्ये तुरुंगातून पळून गेला असून आता बेपत्ता आहे.

डिसेंबर 2021 मध्ये, पुष्पा रिलीज झाला आणि या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. संपूर्ण देशाला या चित्रपटाने वेड लावले. सर्व अडथळे आणि सीमा ओलांडून देशभरातील प्रेक्षकांशी हा चित्रपट कनेक्ट झाला. छोट्या शहरातील रस्त्यांपासून ते क्रिकेट स्टेडियम, राजकीय रॅली आणि कॉर्पोरेट बोर्ड रूम्सपर्यंत, त्याचे डायलॉग्स गाजले, ज्यामुळे पुष्पा सामान्य लोकांपासून सगळ्या क्लासच्या लोकांचा लाडका बनला.

इतकंच नव्हे, तर मुरादाबादमधील लग्नसोहळ्यात आणि इबीझामधील क्लबमध्येही चित्रपटाची गाणी वाजवण्यात आली.

आयकॉनिक स्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'च्या वेधक अवताराने संपूर्ण देशभरातल्या लोकांसाठी एक मनोरंजनाचा धमाकाच होता. असे म्हणता येईल की, 'पुष्पा: द राइज'हा केवळ एक चित्रपट नव्हता तर इंडस्ट्रीला लॉकडाऊनच्या काळात एक वेगळं वळण देणारा चित्रपट होता.

आता पुष्पाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे कारण "द हंट फॉर पुष्पा"या अनोख्या कॉन्सेप्ट व्हिडिओसह, निर्माता मायत्री मूव्हीज ने चाहत्यांना पुष्पा कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. हा व्हिडिओ उद्या सकाळी म्हणजेच आयकॉन स्टार अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या आधी रिलीज केला जाईल.

'पुष्पा: द रूल' स्पष्टपणे त्या चित्रपटासारखा दिसतो जो केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर दर्शकांच्या हृदयावर आणि मनावर राज्य करत संपूर्ण भारतातील चित्रपटासाठी एक नवी पातळी स्थापित करेल.

काल आलेल्या बातमीनुसार पुष्पाचे आतापर्यंतचे सगळे शूट कॅन्सल करण्यात आले असुन हा चित्रपट आता 2024 मध्य प्रेक्षकांच्या भेटीला येईल, या बातमीने अलू अर्जुनचे चाहते नाराज झाले होते पण आता या नव्या व्हिडीओमुळे चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

SCROLL FOR NEXT