Pushpa 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Pushpa 2 Twitter Reaction : टिजर बघुनच कळतं चित्रपट बॉक्स ऑफिसवर कल्ला करणार...पुष्पा फिरसे नही झुकेगा

पहिल्या भागाच्या दमदार यशानंतर आता दुसऱ्या भागात काय बघायला मिळणार हे टिझरमधुन प्रेक्षकांच्या लक्षात आलंय

Rahul sadolikar

पहिल्या भागात कल्ला करणारा पुष्पा आता दुसऱ्या भागातही सिंडिकेटचा राजा बनुन पुन्हा आपली दहशत कायम ठेवणार का हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ रिलीज झाला आहे, ज्याला अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चाहत्यांना एक जोरदार भेट दिली आहे. 

टीझर पाहिल्यानंतर चाहते प्रचंड खुश झाले असुन आता पुष्पा चित्रपटाच्या पडद्यावरही राज्य करणार असल्याचे सांगत आहेत. हा चित्रपट 1000 कोटींची कमाई नक्कीच करेल. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त 'पुष्पा 2' मध्ये फहाद फासिल आणि रश्मिका मंदान्ना देखील दिसणार आहेत.

पुषा २: द रुलच्या टीझरमध्ये पुष्पा तुरुंगातून पळून जातो आणि महिनाभर कुठेही ओळखत नसल्याचे दाखवण्यात आले आहे. लोकांना वाटते की पुष्पा मारला गेला आहे. मात्र पोलीस पुष्पाचा शोध घेत आहेत. 

शहरात महिनाभरापासून दंगल उसळली असून लोकांमध्ये पोलिसांविरोधात संताप आहे. दरम्यान, जंगलात वाघासोबत एक माणूस दिसल्याची बातमी आहे, ती व्यक्ती पुष्पा आहे का? टीव्हीवर तो चेहरा पाहून लोक ओळखतात की तो पुष्पाच आहे.

'पुष्पा 2: द रुल'चा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांना आनंद झाला. विशेष बाब म्हणजे संपूर्ण टीझरमध्ये शेवटच्या काही सेकंदात नायकाची म्हणजेच पुष्पाची झलक दिसत असली तरी ती खूपच ढासु आणि आक्रमक दिसतोय. 

संवादही अप्रतिम आहेत, त्यातला एक डायलॉग खूपच भन्नाट आहे. - जंगलात एखादा प्राणी दोन पावले मागे गेला तर समजा सिंह आला. पण जेव्हा सिंह दोन पावले मागे सरकतो तेव्हा समजा पुष्पा आली आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी अर्ज सादर; उत्तरेत भाजपच्या रेश्मा बांदोडकर, दक्षिणेत सिद्धार्थ गावस तर काँग्रेसतर्फे लुईझा रॉड्रिग्ज रिंगणात

Accident News: गोव्याची सहल ठरली अखेरची; सोलापूरजवळ भीषण अपघात, दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT