मनोरंजन

Michael Gambon: हॅरी पॉटरच्या प्रोफेसर 'डंबलडोअर'ने घेतला जगाचा निरोप, मायकेल गँबन यांचे निधन

Rahul sadolikar

Harry Potter fame Michael Gambon Passes Away : 'हॅरी पॉटर फेम' अभिनेता मायकेल गँबल यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जादूची कांडी हातात घेतलेल्या प्रोफेसर डंबलडोअरचं विलक्षण पात्र साकारणारा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

हॅरी पॉटर सिरीज पाहणाऱ्या प्रत्येक चाहत्याने डंबलडोअरचं हे पात्र डोक्यावर घेतलं होतं. मायकेल गँबलच्या निधनाने हॅरी पॉटरच्या जगभरातल्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या संदर्भातले सविस्तर वृत्त पुढे वाचा.

डंबलडोर काळाच्या पडद्याआड

आपल्या अभिनयाने असंख्य चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या हॉलीवूडचे अभिनेते मायकल गँबन यांचं निधन झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हॅरी पॉटरच्या शेवटच्या सहा चित्रपटांमध्ये हॉगवर्ट्सचे प्रिन्सिपल अल्बस डंबलडोरची भूमिका करणारे मायकेल गॅम्बन यांचे गुरुवारी 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या दुखद बातमीनंतर अनेकांनी आपला शोक सोशल मिडीयावर व्यक्त केला आहे.

हॅरी पॉटर फिल्म्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलचं वृत्त

वॉर्नर ब्रदर्स या प्रॉडक्शन हाऊसच्या मालकीच्या हॅरी पॉटर फिल्म्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने हॉगवॉर्ट्सचे दार उघडून त्याच्या डंबलडोरच्या पात्राचे ब्लॅक- व्हाईट फोटो पोस्ट केले. कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “सर मायकल गॅम्बन यांच्या निधनाबद्दल ऐकून आम्हाला अत्यंत दु:ख झाले आहे. 

त्याने आपल्या विनोद, दयाळू वृत्तीने जगभरातील हॅरी पॉटरच्या चाहत्यांना अपार आनंद दिला. त्यांची आठवण आम्ही आमच्या हृदयात कायम ठेवू.”

हॅरी पॉटरच्या ऑफिशियल पेजवरुन आदरांजली

X (पूर्वीचे ट्विटर), हॅरी पॉटर युनिव्हर्स वरील फॅन पेजने मायकल यांच्या निधनावर शोक व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, "हॅरी पॉटर चित्रपटांमध्ये अल्बस डंबलडोरची भूमिका करणारे मायकेल गॅम्बन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

कृपया या कठीण काळात मायकेल आणि त्याच्या सर्व कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी तुमची कांडी वापरा. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो."

अनेकांनी डंबलडोरच्या अंत्यसंस्कारात, हॅरी पॉटर आणि हाफ-ब्लड प्रिन्स, पाचवा एपिसोड, टेक्स्ट इमोजी किंवा GIF द्वारे, गँबन यांना आदरांजली वाहिली. 

त्या चित्रपटात, दिवंगत अॅलन रिकमनचे सेव्हरस स्नेपचे पात्र डंबलडोरच्या पात्राला अवडा केडावराच्या शापाने मारून टाकते, ज्यामुळे डंबलडोरचे हॉगवॉर्ट्सच्या टॉवरवरून पडणारे संस्मरणीय आणि दुःखदायक दृश्य दिसते.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT