Mahalakshmi-Chandrashekhar Dainik Gomantak
मनोरंजन

Mahalakshmi-Chandrashekhar : या निर्मात्याने केले या प्रसिद्ध अभिनेत्रीशी गुपचूप लग्न..व्हायरल फोटो पाहुन चाहत्यांना सुखद धक्का

तमिळनाडूचे प्रसिद्ध निर्माते रविंदर चंद्रशेखरन अभिनेत्री महालक्ष्मीसोबत लग्नबंधनात अडकले आहेत.

Rahul sadolikar

आपल्या लाडक्या स्टार्स आणि क्रिकेटरबद्दल चाहत्यांना प्रचंड कौतुक असतं. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे चाहते नजर ठेवून असतात. बड्या स्टार्सच्या लग्नाबद्दलही चाहत्यांना अनेकदा उत्सुकता असते, आता नुकतेच तमिळ चित्रपटातील दोन बड्या स्टार्सनी गुपचूप लग्न केले. आणि त्यांचे फोटो व्हायरल होताच चाहते खुश झाले आहेत

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दोन मोठी नावे निर्माता रविंदर चंद्रशेखरन आणि अभिनेत्री महालक्ष्मी 1 सप्टेंबर रोजी विवाहबंधनात अडकल्यानंतर कन्नड चित्रपटसृष्टीत आनंदाची लाट उसळली होती. नवविवाहित जोडप्याने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर जगासोबत ही आनंदाची बातमी शेअर केली

महालक्ष्मीने ऑफिस, उत्तरीपुक्कल, वाणी रानी आणि ओरु काई ओसाई यांसारख्या अनेक टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. चंद्रशेखर यांनी लग्नातील फोटोंसोबत मनापासून एक चिठ्ठीही लिहिली आहे.

ते म्हणतात  मी भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस. तू माझ्या प्रेमाने माझे आयुष्य भरून टाकतेस… लव्ह यू अम्मू ,” .

Mahalakshmi-Chandrashekhar

खाली पाहत महालक्ष्मी खुश दिसत होती, तर तिचा नवरा रविंदर मंगळसूत्र घालण्यासाठी पुढे झुकला होता. दोघेही लग्नाच्या पारंपरिक पोशाखात सजले होते. 

महालक्ष्मीने लाल आणि सोनेरी सिल्कची साडी चमकदार हिरव्या नक्षीदार ब्लाउजसह परिधान केली होती, तर निर्माता चंद्रशेखर यांनी मात्र आपला लूक साधा ठेवला आणि पांढरा कुर्ता-पायजमा सेट घातला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

Goa Crime: वाळपई हादरली! 41 वर्षीय महिलेचे अपहरण करुन जंगलात लैंगिक अत्याचार; अज्ञात नराधमांविरोधात गुन्हा दाखल

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

Drishti Marine: समुद्रात बुडणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवदान, दृष्टी मरीनची कामगिरी; दोन बेपत्ता मुलांना काढले शोधून

Goa News Live: लुथरा बंधूंच्या अटकेवर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे मौन

SCROLL FOR NEXT