Priyanka Chopra with daughter Dainik Gomantak
मनोरंजन

Priyanka Chopra: 'वेळ खरंच पटकन निघून जाते...' लेकीचे फोटो शेअर करताना देसी गर्ल भावूक

Priyanka Chopra: हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने सुंदर कॅप्शनदेखील लिहले आहे.

दैनिक गोमन्तक

Priyanka Chopra shares photo of daughter malti marie on social media emotional post

बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे हे कलाकार नेहमीच चर्चांचा भाग असतात. याशिवाय अनेकदा सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळेदेखील त्यांची चर्चा होताना दिसते. आता बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर आपली मुलगी मालतीसोबतचे फोटो शेअर केल्याने ती चर्चांचा भाग बनली आहे.

प्रियंका चोप्राने इंस्टाग्रामवर आपल्या मुलीसोबतचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. पहिला फोटो हा सध्याचा आहे. तर दुसरा तिच्या जन्माच्यावेळीचा आहे. या दुसऱ्या फोटोमध्ये मालतीचा इवलासा हात प्रियंकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने सुंदर कॅप्शनदेखील लिहले आहे. ती लिहते- 'वेळ खरंच पटकन निघून जाते. आठवड्याची चांगली सुरुवात.' ( Time really flies. starting the week right.)

प्रियंका चोप्राने केलेल्या या पोस्टवर अनेक दिग्गज कलाकार कंमेट करत त्यांच्या नात्याचे कौतुक करताना दिसत आहेत. अनेकांनी मुलं लवकर मोठी होतात आपल्याला कळतदेखील नाही अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी तिचं मोठ होणं एन्जॉय कर असेही लिहले आहे. प्रियंका चोप्राचा नवरा आणि प्रसिद्ध गायक निक जोनस यानेदेखील तिच्या पोस्टवर हार्टच्या इमोजी शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.

मालतीचा जन्म 15 जानेवारी 2022 रोजी सरोगसीद्वारे झाल्याची माहिती आहे. सुमारे 100 दिवस मालती हॉस्पिटलमध्ये अॅडमीट होती. यानंतर जेव्हा तिला घरी आणले तेव्हा प्रियंका आणि निकने तिच्या जन्माबद्दव सगळ्यांना सांगितले होते.

दरम्यान, प्रियांका ऑस्कर नामांकित 'टू किल अ टायगर' च्या टीममध्ये सामील झाली आहे. याची माहितीही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. प्रियांकाचे चाहते तिच्या आगामी हॉलिवूड प्रोजेक्ट 'द ब्लफ'ची वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT