priyanka chopra  Instagram
मनोरंजन

Priyanka Chopra ने न्युयॉर्क इव्हेंटचा शेअर केला व्हिडिओ , 'देसी गर्ल' परदेशात खाताना दिसली पाणीपुरी

प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

ग्लोबल स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहे. ती युनिसेफशी संबंधित एका कार्यक्रमाचा भाग बनली, ज्याचा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये प्रियांका पाकिस्तानी समाजसेविका मलाला युसूफझाईसोबतही दिसली होती. प्रियांका एका फोटोमध्ये निक जोनाससोबत पाणीपुरीचा आस्वाद घेतांना दिसत आहे.

प्रियांकाने ब्लॅक आउटफिटमध्ये चाहत्यांचे मन जिंकले आहे. तिचे चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. देसी गर्लने युनिसेफच्या कार्यक्रमात गोलगप्पा खातानाचा फोटो शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका चोप्रा नुकतीच येथे एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमासाठी तिने ब्लॅक कलरचा बॅकलेस आउटफिट घातला होता. प्रियंका या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

प्रियांकाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. एका व्हिडिओमध्ये ती कारमध्ये बसलेली दिसत आहे. त्याचवेळी पापाराझीसाठी पोज देतांना दिसली आहे. प्रियांका चोप्राचे हे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. काळ्या रंगाच्या ड्रेसमधली प्रियंकाची आकर्षक स्टाईल सगळ्यांनाच आवडते आणि तिच्या फोटो आणि व्हिडिओंवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत आहेत.

प्रियांका चोप्राने सोमवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना मुलांच्या हक्कांबद्दल सांगितले. या कॉन्फरन्सदरम्यान प्रियांका नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईसोबत पोज देताना दिसली. प्रियांका चोप्रा 2016 मध्ये युनिसेफची ग्लोबल सदिच्छा दूत बनली. या संस्थेशी त्या दीर्घकाळापासून जोडल्या गेल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

SCROLL FOR NEXT