Priyanka Chopra Instagram
मनोरंजन

Priyanka Chopra ने निकची स्तुती करत शेअर केला 'हा' फोटो

प्रियांका चोप्राने पती निक जोनासची प्रशंसा करताना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जगभर प्रसिद्ध आहे. 2002 मध्ये 'हमराझ' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. हॉलिवूडचा प्रवास करताना तिने उत्कृष्ट अभिनयाने जगभरात आपला ठसा उमटवला. तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच ती तिच्या पर्सनल लाईफबद्दलही चर्चा करत असते. तिने निक जोनासचे कौतुक करत एक पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे.

* निकचे कौतुक करताना पोस्ट केले

सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच चर्चेत राहणारी प्रियांका चोप्राने निक जोनासचे कौतुक करताना एक पोस्ट शेअर केली आहे. तिने निकचा एक फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. या फोटोमध्ये निक हातात गिटार घेऊन कुठेतरी परफॉर्म करताना दिसत आहे. त्याचा हा फोटो खूप उत्साही दिसत आहे. हा फोटो शेअर करत प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नवऱ्याची कौतुक करणारी पोस्ट.'

प्रियांकाने ही पोस्ट शेअर करताच त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. एका युजर्सने कमेंट करून लिहिले, 'व्वा' तर अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजीसह प्रतिक्रिया दिल्या आहेत.

निकनेही पोस्ट शेअर केली आहे

प्रियंका चोप्राच्या आधी निक जोनासनेही (Nick) एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात पहिल्या फोटोमध्ये तो 'ग्लोबल सिटीझन इव्हेंट'मध्ये परफॉर्म करताना दिसत होता, तर दुसऱ्या फोटोमध्ये तो प्रियांकाला मिठी मारतांना दिसत आहे. या फोटोत प्रियांकाचा उल्लेख करत त्याने लिहिले, ‘तुझा अभिमान आहे. दोघेही अनेकदा असे फोटो एकमेकांसोबत शेअर करत असतात.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. तेव्हापासून दोघेही अनेकदा लाइमलाइटचा भाग असतात. त्याच वर्षी सरोगसीच्या माध्यमातून हे दोघेही एका मुलीचे पालक झाले आहेत. त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT