Prasad Oak Post on Eknath Shinde
Prasad Oak Post on Eknath Shinde Instagram
मनोरंजन

‘धर्मवीर’ मधील खास फोटो शेअर करत प्रसाद ओकने दिल्या महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

दैनिक गोमन्तक

राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंर्घषावर अखेर पडदा पडला आहे. अंतिम टप्प्यात भाजपने मुख्यमंत्रीपदा मान एकनाथ शिंदे यांना दिला तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. गुरुवारी संध्याकाळी राजभवनात हा शपथविधी पार पडला. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपचा उद्देश स्पष्ट झाल्याचे बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि सर्व सामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. अलिकडेच अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. (prasad oak share Instagram post after Maharashtra new cm eknath shinde News)

प्रसाद ओक (Prasad Oak) याने अलिकडेच इंन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने दोन खास फोटोदेखील शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये धर्मवीर आनंद दिघेंच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओकने एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. हा फोटो (Photo) धर्मवीरच्या ट्रेलर लाँचदरम्यानचा आहे तर दुसरा फोटो हा धर्मवीर चित्रपटातील आहे. यात एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) हे एका मंदिरात देवासमोर हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे. हे दोन्ही फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलेच चर्चेत आले आहे.(Prasad Oak Post on Eknath Shinde)

प्रसाद ओकने कॅप्शनमध्ये लिहीले या फोटोला दिले आहे.“मा. मुख्यमंत्री…श्री एकनाथजी शिंदे साहेब… मनःपूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा…!!!”, त्याचा हा फोटो आणि पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

प्रसाद ओक याने 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटात (Movie) धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी तसेच प्रसादच्या भूमिकेसाठी एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा होता. प्रसाद ओक आणि एकनाथ शिंदे यांचे फार चांगले संबंध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT