Adipurush Release Dainik Gomantak
मनोरंजन

Adipurush Release: प्रभासचा 'आदिपुरुष' ठरतोय थट्टेचा विषय! चाहते म्हणतायेत हे रामायण आहे की PUBG

Adipurush Release: तेल तेरे बाप का, आग तेरे बाप की अशा संवादामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Adipurush Release: बहुप्रितिक्षित आणि मोठा चर्चेत असलेला आदिपुरुष चित्रपट अखेर आज प्रदर्शित झाला आहे. सुपरस्टार प्रभास, बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

याबरोबरच मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेदेखील हनुमंताच्या भूमिकेत दिसून येत आहे. रामायणावर आधारित असलेला हा चित्रपटाचे ओम राऊत यांनी डायरेक्शन केले आहे.

चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया

आदिपुरुष रिलिज झाल्यानंतर चित्रपटावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसून येत आहेत. काहींच्या चित्रपट पसंतीस उतरला आहे तर काहींनी आदिपुरुषने निराश केल्याचे म्हटले आहे. चित्रपटातील संवाद आणि व्हीएफक्सच्या प्रभावाची उणीव दिसत असल्याचे मत अनेक प्रेक्षकांनी मांडले आहे.

चित्रपटातील संवाद रामायणासारख्या कथेला अनुरुप नाहीत. जसे की, तेरे बुवा का बगीचा है क्या ? जो हवा खाने चला गया. याबरोबरच, कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग तेरे बाप की अशा संवादामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे.

चित्रपट समीक्षक विश्वजीत पाटील यांनी म्हटले आहे की, आदिपुरुषने घोर निराशा केली आहे. व्हीएफक्सचा दर्जा चांगला नसून कंटेटलादेखील न्याय मिळाला नाही. आदिपुरुष गेमचेंजर ठरु शकला असता मात्र आता ती संधी गमावली आहे.

याबरोबरच, ट्विटरवर एका युजरने 'प्रभासची तिरस्कार करत नाही मात्र रामायण मालिकेची स्पर्धा कोणी करु शकत नाही 'असे म्हणत रामायण मालिकेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. दुसऱ्या एका युजरने जे तटस्थ प्रेक्षक आहेत ते चित्रपटातील व्हीएफएक्सपेक्षा पबजी आणि फ्री फायर गेम बरे असे म्हटले आहे.

काहींना चित्रपट आवडला नसला तरीही अनेकांनी हा चित्रपट पाहण्याचे आवहन करत आपल्या कुटुंबासोबत चित्रपटाचा आनंद घ्या म्हटले आहे. प्रभास रामाच्या भूमिकेत शोभत नसल्याचे काहींनी म्हटले आहे तर काहींनी प्रभासच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

क्रिती आणि सैफ अली खानने आपल्या भूमिकेला न्याय दिल्याचे मत अनेकजण मांडत असल्याने आत्तापर्यत संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. 50 कोटी बजेटमध्ये बनवलेला चित्रपट 100 कोटींपर्यत कमाई करेल असा अंदाज लावण्यात येत आहे. मात्र आता हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर किती कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT